ठाणे

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमध्ये “मिठाई व लाडू वाटप”

वॉर्ड क्रं. ५७ मध्ये “संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर” संपन्न

अंबरनाथ दि. १२ (नवाज अब्दुलसत्तार वणू)  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष तथा  कृषिरत्न शरदचंद्र पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहराच्या वतीने शहराध्यक्ष सदाशिव पाटील व युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांच्या तर्फे “नाका कामगारांना व गरीब गरजूंना मिठाई व लाडू वाटपाचा” कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजी चौक येथे आयोजित करण्यात आला होता. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. तसेच वॉर्ड क्रं. ५७ मध्ये नगरसेवक तथा जिल्हाध्यक्ष सचिन पाटील युनिकेअर हेल्थ सेंटरच्या सहकार्याने संपूर्ण “आरोग्य तपासणी शिबीराचे” देखील आयोजन करण्यात आले होते. यात संपूर्ण बॉडी अनालिसिस व ब्लड टेस्ट” आदी तपासणी करण्यात आली.

         या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष पुष्पराज (गणेश) गायकवाड, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार, युवती अध्यक्ष ऐश्वर्या मोटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनील अहिरे, प्रफुल थोरात, सोशल मीडिया सेलचे तालुका विधानसभा अध्यक्ष मिलिंद मोरे, बळीराम साबे (काका) यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
         पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस मिठाई वाटप करून साजरा करतच आहोत, परंतु, यावर्षीचा वेगळा आनंद याठिकाणी सर्वांना पाहायला मिळत आहे. कारण “भारतीय जनता पक्षाचा परतीचा मार्ग” हे आपण फक्त बोलत होतो. परंतु, परतीच्या मार्गाची सुरुवात झालेली असून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींच्या रूपाने एक नवीन विजय देशामधील ३ ठिकाणी राज्य स्थापन करण्याकरीता मार्ग खुला झालेला आहे. म्हणून यंदा एक वेगळा आनंद शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील व शहराध्यक्षा पूनम शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!