ठाणे

कान्होर गांव ग्रामपंचायत तर्फे महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

अंबरनाथ दि. १७ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
          महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून फक्त झाडे न लावता त्यांचे संगोपन करत आहेत, तसेच आज मी मुरबाड विधानसभेचा आमदार झालो ते नानासाहेबांच्या आर्शिवादानेच, कारण जिल्हापरिषद अध्यक्ष झाल्यानंतर मी थांबणार होतो, पण नानासाहेबांनी मला सांगितले की, तुला अजून पुढे जायचे आहे आणि मी पुढे गेलो व आज तुमच्यासमोर आमदाराच्या रुपात उभा आहे, असे मार्गदर्शन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी यावेळी केले.
         
अंबरनाथ तालुक्यातील कान्होर गांव ग्रामपंचायत तर्फे महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचा अनावरण सोहळा आज कान्होर गांव ग्रामपंचायत याठिकाणी संपन्न झाला. धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्याहस्ते करण्यात आले.
         याप्रसंगी कान्होर गांव ग्राम पंचायतीचे सरपंच आरती अतुल राऊत, उपसरपंच जयश्री दिलीप तरे, गांव तंटामुक्तीचे नारायण रसाळ, माजी सरपंच श्रीराम राऊत, माजी सरपंच कैलास राऊत, प्रकाश मधुकर पांडे, कृष्णाबाई देशमुख, दीपाली भोपी, पल्लवी राऊत, संतोष देशमुख, शंकर वळवी, किरण राऊत यांच्यासह नानासाहेब धर्माधिकारी यांचे बैठकीतले महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रकाश मधुकर पांडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच नानासाहेबांनी केलेल्या कार्याची, विविध प्राप्त पुरस्कारांची व त्यांच्या जीवनाची माहिती उपस्थितांना यावेळी देण्यात आली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!