ठाणे

दिव्यांगांच्या जीवनात दिव्य ज्ञानाचा प्रकाश ; नाकोडा कर्ण बधीर विद्यालयात निरंकारी सत्संग

कल्याण : दिव्यांग मुलांचे जीवन दिव्य ज्ञानाच्या प्रकाशाने अंतर्बाह्य उजळून गेले तर मानवी जीवनाचा उद्देश सार्थक करुन ते पूर्णत्वाला जाईल असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळाचे ज्ञान प्रचारक तथा निरंकारी मराठी साहित्य अवलोकन समितीचे संयोजक स.वि.लव्हटे यांनी केले.

कल्याण-भिवंडी मार्गावरील सरवली या गावात भैरव सेवा समिती या संस्थेच्या नाकोडा कर्णबधीर विद्यालयामध्ये रविवार, दि.१६ डिसेंबर रोजी संत निरंकारी मंडळाच्या डोंबिवली झोनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष सत्संग समारोहामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये सुमारे १६० विद्यार्थ्यांसह विद्यालयातील शिक्षकवर्ग आणि स्थानिक निरंकारी भक्तांनी भाग घेतला.

नाकोडा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी दुनगे (मेघा मॅडम) आणि संत निरंकारी मंडळाचे स्थानिक प्रबंधक चंद्रहास चौधरी व मंडळाच्या कल्याण शाखेचे सेक्टर संयोजक तथा ज्ञान प्रचारक जगन्नाथ म्हात्रे यांच्या पुढाकाराने मंडळाच्या डोंबिवली झोनचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

श्री.लव्हटे यांनी संत निरंकारी मिशनच्या वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपेने कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना “ब्रह्मज्ञान” प्रदान केले. कर्णबधीर विद्यार्थ्यांना ब्रह्मज्ञान प्रदान करण्याचा हा आगळा-वेगळा उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी शाळेतील शिक्षिका सुवर्णा उगले, सपना गोसावी, कुसुम खातले यांच्या सहयोगाने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. श्री.लव्हटे यांच्याकडून प्रकट केली जाणारी ज्ञान प्रदानाची प्रक्रिया या कर्णबधीर मुलांना त्यांना कळेल अशा सांकेतिक भाषेमध्ये लगोलग (समानांतर) रुपांतरित करुन सांगण्यात येत होती. त्यामुळे ज्ञानाच्या प्रत्येक मुद्याच्या बाबतीत बालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. “ब्रह्मज्ञान”प्राप्तीनंतर सर्व बालकांच्या चेहऱ्यावर आनंद विलसताना दिसत होता. ज्ञान समजल्याची पावती त्यांनी हात उंचाऊन दिली आणि उपस्थित सर्वांनाच अलौकिक आनंद झाला.

तत्पूर्वी, निरंकारी संतांचे शाळेच्या प्रांगणात आगमन होताच दिव्यांग विद्यार्थ्यांकडून लेझीम व बॅण्डद्वारे हार्दिक स्वागत करण्यात आले. तदनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी दुनगे यांनी मूक कर्णधीर विद्यार्थ्यांचे यशस्वी जीवन घडविण्यासाठी शाळेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष नेऊन माहिती दिली, ज्यामुळे मिशनचे संतजन अत्यंत प्रभावित झाले व त्यांनी संस्थेच्या कार्याचे मन:पूर्वक कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी दुनगे यांनी केले. संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी भक्तीरचनेवर आधारित सादर केलेल्या दोन नृत्यांद्वारे कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर मंडळाचे डोंबिवली येथील क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे आणि कल्याणचे सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांनी आपले भाव व्यक्त करताना संत निरंकारी मिशनची विचारधारा समजावून सांगितली.

या कार्यक्रमामध्ये पंचायत समिती सदस्य सुरेंद्र भोईर, सरवली पोलीस पाटिल सुनिळ चौधरी, शिवसेना तालूका उपप्रमुख श्याम चौधरी, क्रुषी ऊत्पन्न बाजार समिती संचालक प्रभाकर पाटिल, माजी सरपंच पंडित चौधरी,ग्राम पंचायत सदस्या रंजना चौधरी, प्राध्यापक बंडु पाटिल, ग्राम पंचायत सदस्य नामदेव चौधरी,माजी सरपंच महेंद्र चौधरी, शाखा प्रमुख मानिक पाटिल, प्रेस सदस्य जगदीश म्हात्रे हे मान्यवर उपस्थित होते.

संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेवादल युनिट नं. ६६१ च्या जवानांनी युनिटचे संचालक श्री.प्रकाश कोकतरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या व्यवस्थेमध्ये सर्वतोपरी सहकार्य केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!