ठाणे

महिला बचत गटांना हवीय नुकसानभरपाई…. अन्यथा आंदोलनाचा इशारा

डोंबिवली : ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने प्रथमच डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथे महिला बचत गटांचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. पालिकेचे मात्र नियोजन व्यवस्थित न नसल्याने आणि जाहिरात केली नसल्याने महिला बचत गटाच्या स्टॉलला ग्राहकांनी पाठ दाखविल्याने संतप्त महिलांनी कार्यक्रमात आलेल्या महापौर विनिता राणे यांना घेराव घातला होता.सोमवारी महिला बचत गटातील महिलांनी कल्याण येथील पालिकेच्या मुख्यालयात पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना निवेदन दिले.बचत गटांना नुकसानभरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

      कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील आणि ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटांना केंद्र व राज्‍य सरकारतर्फे दिल्‍या जाणा-या विविध योजनांची माहिती व्‍हावी, महिला विषयक कायद्यांचे मार्गदर्शन तसेच महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्‍ध होण्‍यासाठी २४ डिसेंबर ते २५ डिसेंबर रोजी जिल्‍हास्‍तरिय महिला बचत गटांचा मेळावा डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलनात आयोजित करण्यात आला होता. या बचत मेळाव्यासाठी विविध कार्यक्रम व महिलांच्या बचत गटाना रोजगारा उपलब्ध करून देण्यासाठी  दोनशे हुन अधिक स्टॉल मोफत उपलब्ध करून दिले होते.  . यंदाच्या मेळाव्यासाठी महिला व बाल कल्याण विभागासाठी  सन २०१९ ते २०२० च्या अर्थसंकल्पात अंदाजित ३५ लाखाची तरतूद पालिकेतर्फे करण्यात येणार आहे.या मेळाव्याला  प्रसिद्धी न मिळाल्याने बचत गटाच्या स्टॉलकडे  ग्राहकांनी  फिरविल्याने विविध वस्तूंच्या विक्रीसाठी आलेले बचतगट चिंताग्रत झाले होते. मेळाव्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत ग्राहक फिरकलेच नसल्याने मेळाव्यात सहभागी झालेल्या शेकडो महिला बचत गटांना नुकसानीला सामोरे जावे लागले.या बचतगटाच्या महिलांनी विक्रीसाठी हजारो रुपयांचा आणलेला माल विक्रीस गेला नाही.तर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टाॅल लावलेल्या महिला बचत गटांना त्यानीं विक्री साठी ठेवलेले खादय पदार्थाचे नाशवंत असल्याने दरदिवशी फेकून देण्याची वेळ आली होत .या तीन दिवशी मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर माल विक्रीस गेला नसल्याने आर्थिक नुकसान बरोबर वेळेचा अपव्यय झाल्याने बचत गटातील महिलांनी नाराजी व्यक्त केली.सोमवारी महिला बचत गटातील महिलांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना निवेदन दिले.महिला बचत गट मेळावा फ्लॉप होण्यास पालिका प्रशासन जबाबदार असून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याची पत्र कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण,आमदार सुभाष भोईर,महापौर विनिता राणे,महिला व बाल कल्याण समिती सभापती दिपाली पाटील आणि स्थायी समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर, मनसे गटनेते मंदार हळबे आणि शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर यांना दिली आहे.

   वास्तविक पालिका प्रशासनाने जिल्हास्तरीय बचत गट मेळावा शहरात ठेवणे आवश्यक होते. क्रीडा संकुल हे लांब असल्याने याचा विचार प्रशासनाने आधीच करायवयास हवा होता.प्रशासनाने महिला बचत गटांना नुकसानभरपाई दिलीच पाहिजे.शिवसेना आणि भाजपच्या वादामुळे हे नुकसान झाले आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!