ठाणे

आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना मोबाईल  ऍपचे वाटप 

डोंबिवली : ( शंकर जाधव  ) कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील पडले, शिळ, दिवा येथील शाळांमध्ये आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थांना परीक्षेच्या तयारीकरिता त्याचप्रमाणे अभ्यास सोप्या पद्धतीने करण्याकरिता मोफत मोबाईल एॅॅपचे वाटप करण्यात आले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी तसेच अभ्यासाच्या दृष्टीकोनातून दहावीचे कठीण वर्ष सोपे जाण्यासाठी आयडियल मार्फत तयार करण्यात आलेले अद्ययावत स्वरूपाचे आयडियल १० हेमोबाईल   ऍप  विद्यार्थ्यांना देण्यात आले.

           कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सरस्वती विद्यालय, पडले गाव येथील दहावीचे १३१ विद्यार्थी, शिळ गावातील हाशा रामा पाटील विद्यालयातील १४८ विद्यार्थी, गणेश विद्या मंदिर, दिवा येथील  २५५ विद्यार्थी व इंग्रजी माध्यम ५० विद्यार्थी, एसएमजी विद्यालय दिवा ३७० विद्यार्थी तसेच दिवा हायस्कूल मधील १७० विद्यार्थी अशा तब्बल ११२४ दहावीच्या विद्यार्थ्यांना या आयडियल १० मोबाईल   ऍप    चा लाभ देण्यात आला.या मोबाईल ऍपमध्ये बोर्डाच्या परीक्षेत बदललेल्या अभ्यासक्रमानुसार परिपूर्ण तयारी, पाठ्यपुस्तक वाचून झाल्यावर आकलनासाठी व उजळणीसाठी उपयुक्त नोट्स, भाषा विषयांसाठी बेसिक व्याकरणसहित मार्गदर्शन, प्रत्येक धड्याचे महत्वाचे मुद्दे, सूत्रे, सनावळी, प्रश्नोत्तरे यांचा समावेश जास्तीत जास्त मार्क मिळण्याची टिप्स, बदललेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, विद्यार्थ्यांचे समुपदेशन व करियर मार्गदर्शन अशा विविधांगी स्वरूपाने बनविण्यात आलेल्या मोबाईल  ऍप  चे वाटप आज मोफत आमदार सुभाष भोईर यांनी केले. यावेळी दिवा हायस्कुलचे संस्थापक गोवर्धनदादा भगत, ठाणे उपशहर प्रमुख ब्रम्हाशेठ पाटील, डोंबिवली उपशहर प्रमुख अभिजित थरवळ, विभाग प्रमुख अरुण म्हात्रे, उमेश भगत, युवसेना युवा अधिकारी सुमित सुभाष भोईर, शाखाप्रमुख दिलीप पाटील, वैकुंठ म्हात्रे, श्याम काठे, सुनील अलीमकर, एसएमजी शाळेचे अध्यक्ष स्वप्नील मारुती गायकर, युवासेनेचे अभिषेक ठाकूर आशिष शिंदे, आकाश म्हात्रे, मोरेश्वर अलिमकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!