ठाणे

डोंबिवलीतील स.वा. जोशी शाळेच्या माजी विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन

डोंबिवली : ( शंकर जाधव ) स.वा.जोशी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना विशेषतः १९७५ सालच्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना कधीही विसरता येणार नाहीत आणि विसरल्या जाणार नाहीत अश्या आठवणी देऊन गेल्या. १९७५ सालच्या दहावीच्या पहिल्या-वहिल्याबॅचचे स्नेहसंमेलन तब्बल ४३ वर्षे उलटूनहि ७५  हून जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

विशेष म्हणजे कधीही शाळेत वेळेवर न येणाऱ्या विद्यार्थ्यांसह सगळे आधीच उपस्थित होते.त्यातले काहीजण एकमेकांना शाळेतून बाहेर पडल्यापासून पहिल्यांदाच भेटत होते. अगदी जुन्या टोपणनावाने एकमेकांचे स्वागत करण्यापासून ते आधी कधी एक शब्दही एकमेकांशी बोलण्याची वेळ किंवा संधी न आलेलेही इतक्या आस्थेने एकमेकांशी बोलताना पाहणे आणि अनुभवने हाच एक आनंददायी अनुभव होता.अशा अनौपचारिक वातावरणातून सगळ्यांना औपचारिक कार्यक्रमाला आणणे हेच एक आव्हान होते.ते काम केले संजय दीक्षित यांनी केले. सरस्वतीच्या प्रतिमेला हार अर्पण करून जेव्हा त्यांनी शाळेची प्राथर्ना सुरु केली तेव्हा ती वैयक्तिक प्रार्थना केव्हा सामूहिक झाली हेच कोणाला कळले देखील नाही.त्याच ओघात सरस्वती प्रार्थन, गणेश वंदनेने संपूर्ण झाली. त्या बॅचचे आता हयात नसलेल्या आपल्या वर्गमित्र-मैत्रिणीना श्रद्धांजली वाहत असताना सगळ्यांचेच पाणावलेले डोळे आणि जडावलेले आवाज कार्यक्रमाला वेगळ्याच वातावरणात घेऊन गेले.हे वातावरण नेहमीचे करण्याची जबाबदारी चन्द्रशेखर टिळक यांच्या प्रास्ताविकाने पार पाडली. एरवी अर्थतज्ज्ञ असणाऱ्या शेखर यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी अशा छोटेखानी भाषणाने सगळ्यांना विद्यार्थी दशेची सफर घडवली.वर्गात बाकांच्या रांगा कधीही न मोडलेल्या विद्यार्थ्यांच्या खुर्च्या गोलाकार फिरवून घेण्याचा मोह काही आवरला नाही. एकमेकांचा परिचय करून देण्याइतका कंटाळवाणा होऊ शकणारा हा कार्यक्रम सुमारे अडीच तास रंगला.एखाद्याने स्वतःची ओळख करून द्यायला सुरूवात करावी आणि तो किंवा ती सोडून इतरांनीच तिच्या किंवा त्याच्या विषयी जास्त सांगावे यातून निर्माण झालेला माहोल सगळ्यांना शाळेतल्या ऑफ पिरियडमधे घेऊन गेला.जेवणानंतर रंगलेला करमणुकीचा कार्यक्रम हा सर्वोच्च बिंदू स्वाती मोडक, अरुणा खरे यांनी म्हणलेली गाणी, नीलम रणदिवे, संगीता जेठे, मुकुंद साबळे यांचे कविता वाचन सगळ्यांचीच उत्स्फूर्त दाद मिळवून गेले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने प्रत्येक उपस्थित विद्यार्थ्याने शाळेला दिलेल्या देणगीचे धनादेशही सुपूर्द करण्यात आले. शाळेत असताना लेक्चर्स बंक करण्याची इच्छा असणारे सगळे कार्यक्रमाच्या दिवशी वंदे मातरम झाल्यावरही घरी परत जाण्याआधी रेंगाळत होते. एक आनंदी दिवस आणि अनेक अविस्मरणीय आठवणी यांचे हे गणित जुळवून आणण्यात गिरीश शेवडे, संजय दीक्षित, विलास देशमुख,माधुरी आठल्ये, राजन सावरे, सतीश अटकेकर, दुर्गेश कामत यांनी मोठी मेहनत घेतली होती.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!