ठाणे

दर्पणकार कै.बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने पत्रकारांना पुरस्कार प्रदान…

 डोंबिवली :- (प्रतिनिधी ) मराठी पत्रकारतेचे जनक दर्पणकार कै.बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी दर्पण साप्ताहिक ६ जानेवारीला सुरु केले.त्याची आठवण म्हणून सर्वत्र हा दिवस `पत्रकार दिन`म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून डोंबिवलीत ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य आणि सहकारी गेली अकरा वर्षे पत्रकार दिन साजरा करत असून हा १२ वा पत्रकार दिन ७ जानेवारीला रोजी श्रीगणेश मंदिराच्या वरद सभागृहात पार पडला केला आहे. यावेळी पाच पत्रकारांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

  यावेळी प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार शामसुंदर सोन्नर,राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे,बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर,स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे,कॉंग्रेस प्रतिनिधी संतोष केणे,मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम, मनसे गटनेते मंदार हळबे,रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनी विजयसिंग पवार,रोटरी मिटटाऊनचे अध्यक्ष गुलाब पावळे, गजाजन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विष्णूकुमार चौधरी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.यावेळी यावर्षी कै.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार माधव डोळे, शिक्षणमहर्षी कै.सुरेंद्र बाजपेयी पुरस्कार राजलक्ष्मी पुजारे-जोशी,कै.श्रीकांत टोळ पुरस्कार कल्पेश गोरडे,लव अंकुशचे संपादक कै.चंद्रकांत गोरे पुरस्कार कुणाल म्हात्रे,आणि कै.पत्रकार नरसिंह खानोलकर पुरस्कार नरेद्र थोरावडे यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी  पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून शामसुंदर सोन्नर यांनी यावेळी पत्रकार बाराही महिने कश्या प्रकारे वार्तांकन करतात याची माहिती देऊन त्याच्या कामाचे कौतुक केले.यावेळी रिपाईचे माणिक उघडे,मनवीसे डोंबिवली शहरअध्यक्ष सागर जेधे,इनरव्हील क्लबच्या स्वाती सिंग आणि रॉयल महाविद्यालयातील पत्रकार प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित दर्शविली. ज्येष्ठ पत्रकार शरद शहाणे, शंकर जाधव, सारिका शिंदे,महावीर बडाला यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!