ठाणे

दिव्यातील रस्ता रुंदीकरणबाधित राहिवाशांवर अन्याय होऊ देणार नाही- आमदार संजय केळकर

ठाणे :  महापालिका चुकीच्या पद्धतीने रुंदीकरण कारवाई करत असून त्याचा निषेध नोंदवन्यासाठी भाजपा दिवा शीळ मंडळ अध्यक्ष अँड.आदेश भगत यांच्या नेतृत्वाखाली बाधित रहिवाशांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
 
दिवा शहरातील आगासन रस्ता जंक्शन ते दिवा पूर्व स्टेशन येथील रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला असून ठामपा आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या आदेशानुसार लवकरच दिव्यातील 22 इमारतींवर तोडक कारवाई केली जाणार आहे. सदर रस्तारुंदीकरणात बाधित होणाऱ्या एकाही नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही व वेळ पडल्यास रहिवाशांसाठी आंदोलन केले जाणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी उपोषण स्थळी उपस्थित असणाऱ्या रहिवाशांना सांगितलं.
 
दिवा स्टेशन रोड वरील सर्व बाधित इमारती १५ ते २० वर्षांपासून उभ्या असून आपल्या आयुष्य भराची पुंजी जमा करून सामान्य व कष्टकरी नागरिकांनी दिव्यात घरे घेतली आहेत.सध्याचा अस्तित्वात असलेला रस्ता हा मुळातच मोठा असून येथे बसणारे फेरीवाले, बेकायदा गाडी पार्किंग व बेशिस्त रिक्षा चालकांमुळे येथे वाहतूक कोंडी होत आहे. ठाणे महानगर पालिकेने व येथील लोकप्रतिनिधींनी या गोष्टी कडेलक्ष दिल्यास सदर रस्ता रुंदीकरणाची आवश्यकताच भासणार नाही,  शिवाय दिवा पूर्व व दिवा पश्चिम ला जोडणारा प्रस्तावित उड्डाणपूल दिवा स्टेशन रोड वरून न बांधता अन्य ठिकाणावरून उभारल्यास स्टेशन परिसर अधिक सुटसुटीत होईल असे रहिवाशांचे म्हणणे आहे आणि याच मागणीसाठी सर्व रहिवासी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले होते.सदर उपोषणाला आमदार संजय केळकर, माजी उपमहापौर अशोक भोईर यांनी भेट दिली व आपण राहिवाशांसोबत असल्याचे मत व्यक्त केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!