ठाणे

जनतेला खूप वर्ष अजून उत्तरं द्यायची आहेत ,मी खोटं बोलून लोकांपुढे जाणार नाही  -युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे….. सिटीपार्क’ प्रकल्पाचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न

डोंबिवली : ( शंकर जाधव ) राजकारणात आलो तेव्हा दृष्टिकोन वेगळा होता.राजकारण म्हणजे निवडणूक नाही ,2 निवडणुकीच्या मध्ये जे काही होतं ते राजकारण, समाजकारण शिवसेनेसाठी 100 टक्के ठरले आहे.शिवसेना यामध्ये काम करीत आली आहे.जनहिताची कामे आनंद देतात,निवडणुकीत हार जित सुरू असते,मात्र या कामातून मिळणारे आशिर्वाद महत्वाचे आहेत मी  तरुण म्हणून 2 पैलू बघत असतो.जनतेला खूप वर्ष अजून उत्तरं द्यायची आहेत ,मी खोटं बोलून लोकांपुढे जाणार नाही असे युवानसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले .ते कल्याण मध्ये सिटीपार्क’ प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्या साठी कल्याणात आले होते .स्मार्ट सिटीतील पहिल्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ आज रोवण्यात आली
           कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महत्वाकांक्षी ‘सिटीपार्क’ प्रकल्पाचे युवासेनाप्रमूख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन आज संपन्न झाले यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार नरेंद्र पवार, महापौर विनिता राणे, पस्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, सभागृह नेते श्रेयस समेळ, पालिकाआयुक्त गोविंद बोडके, माजी महापौर राजेंद्र देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी आजचा हा प्रकल्प भूमीपूजन महत्वाचे आहे.या प्रकल्पचया माध्यमांतून कल्याणासाठी काहीतरी नवीन करणार आहोत.विकासासाठी सगळे एकत्र येत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे,निवडणुकीच्या मधल्या काळात पाहणी दौरे बरेच असतात.राजकारणात आलो तेव्हा दृष्टिकोन वेगळा होता.राजकारण म्हणजे निवडणूक नाही.2 निवडणुकीच्या मध्ये जे काही होतं ते राजकारण.समाजकारण शिवसेनेसाठी 100 टक्के ठरले आहे.शिवसेना यामध्ये काम करीत आली आहे.जनहिताची कामे आनंद देतात.निवडणुकीत हार जित सुरू असते.मात्र या कामातून मिळणारे आशिर्वाद महत्वाचे.तरुण म्हणून 2 पैलू बघत असतो.जनतेला खूप वर्ष अजून उत्तरं द्यायची आहेत.मी खोटं बोलून लोकांपुढे जाणार नाही.स्मार्टसिटी म्हणजे नक्कि काय?.नुसते इंटरनेट,केबल,वायफाय कनेक्टिव्हिटी नाही तर चांगली सिटी कशी होईल हे महत्वाचे आहे इतर शहरही विकसित होणे गरजेचे आहे.मेट्रोनंतर ठाण्यात अंतर्गत मेट्रो प्रकल्प मंजूर केला आहे.हवाई रिक्षा हा प्रकल्प आपण ठाण्यात राबवणार आहोत.कल्याण डोंबिवलीत देखील हवाई रिक्षा आणली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले .यावेळी बोलताना पालकमंत्री एकनाथ शिदे यांनी सिटीपार्कचे स्वप्न शिवसेना पक्षप्रमुखांनी पाहिले आहे.उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट साकार होत आहे.शहरासाठी एक चांगले सिटीपार्क असावे याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या.याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठे उद्यान होत आहे .अनेक अडचणी परवानग्या घेत इथपर्यंत आलोय.गेली अनेक वर्षे याठिकाणी मूलभूत सोयी सुविधा देण्याचे काम केल्यानेच स्मार्टसिटीमध्ये कल्याण डोंबिवलीचा समावेश झाला आहे.हा वचनपूर्ती सोहळा आहे.शिवसेना प्रमुखांनी सांगितल्यानंतर लगेचच काळा तलाव सुशोभीकरण केले.उद्धव ठाकरे हे हीच परंपरा पुढे नेत आहेत.उद्धव ठाकरे यांचा आग्रह कल्याण डोंबिवली शहरं स्वच्छ असली पाहिजेत.लोकांची अपेक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजेत.इथले अरुंद रस्ते वाहतूक कोंडीला कारणीभूत असून ठाण्याप्रमाणे इथल्या लोकांचे पुनर्वसन करा असे आयुक्तांना सांगितले शहर विकासात आम्ही कोणतेही राजकारण करीत नाही.आपल्याला मिळालेल्या अतिरिक्त आरोग्यमंत्रीपदातून आपण इथल्या आरोग्याच्या सुविधांसाठी प्रयत्न करणार,रिंगरोड प्रकल्प वाहतूक कोंडीच्या दृष्टीने महत्वपूर्ज ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले तर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी
पालिकेचा पदभार स्वीकारल्या नंतर ज्या पहिल्या कमला मान्यता दिली त्या कामाचे युवा नेत्याचा हस्ते भूमिपूजन आज संपन्न झाले .सिटीपार्क 110 कोटीचे प्रोजेक्ट आहे.तसेच 450 कोटींचा कल्याण स्टेशन एरिया डेव्हलपमेंट प्रकल्प लवकरच सुरू होणार.टाऊन प्लॅनिंग प्रकल्प सापर्डे येथे होणार. नदीकिनारा सुशोभीकरण प्रकल्प साकारणार आहे…स्मार्टसिटी अंतर्गत 1 हजार 400 कोटीचे प्रकल्प येत्या काळात सुरू होणार.त्याव्यतिरिक्त इतरही महत्वाचे प्रकल्प आपण हाती घेणार आहोत.कल्याण डम्पिंगवर येत्या एप्रिलपर्यंत कचरा टाकणे बंद होणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले ज्या जमिनी घेणार आहोत त्या शेतकऱ्यांना जमीन मालकांना  4 एफएसआय देणार असल्याचे त्यांनी सांगितले  .आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याणकरांना एक चांगली भेट मिळत आहे.कल्याण डोंबिवलीच्या विकासात ठाकरे कुटुंबियांचे मोठे योगदान आहे.युतीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात सरकार काम करत आहे.कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी भाजप शिवसेना आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले .तर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आजचा दिवस स्वर्णक्षराने लिहिण्यासारखा आहे.कल्याणकर ज्या प्रकल्पाची आतुरतेने वाट पहात होते.या प्रकल्पासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.कल्याण डोंबिवली हा युतीचा बालेकिल्ला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रयत्न करून कल्याण डोंबिवलीचे नाव स्मार्टसिटी यादीमध्ये असून या प्रकल्पातून 1 हजार 440 पेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे.हे शहर एका वेगळ्या दिशेने जाण्यास सुरुवात झाली आहे.वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत.कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी नागपूर शहराप्रमाणे याठिकाणीही प्रकल्प राबवणे आवश्यक आहे ,पुण्याप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे कल्याण डोंबिवलीत उभारणार.नदी आणि खाडीकिनारा सुशोभीकरण करण्यासाठी 60 कोटी निधी दिला असून  जलवाहतुकी सुरू होण्यासाठी कल्याण डोंबिवलीत 2 जेट्टी उभारणार असल्याचे सांगितले .
चढाओढीत  तबबल 6 महिन्या नंतर सेनेने बाजी मारली

ऑगस्ट महिन्यात या कामासाठी ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली होती मात्र सत्ताधारी शिवसेना भाजपा कडून या कामात श्रेयाची चढाओढ लागली होती. हा प्रभाग भाजप नगरसेवकाचा असल्यामुळे मुख्यमंत्र्याच्या हस्ते हे भूमिपूजन व्हावे यासाठी स्थानिक नगरसेवक दया गायकवाड आग्रही होते तर सत्ताधारी शिवसेनेकडून आपल्या नेत्यांची वेळ घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते या चढाओढीत  तबबल 6 महिन्या नंतर सेनेने बाजी मारली मात्र हा भूमीपूजनाचा कार्यकर्मासाठी शिवसेना भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

मनसे महिला सेनेची निदर्शने
सिटीपार्कच्या भूमीपूजनासाठी आदित्य ठाकरे आले होते यावेळी याच परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या कार्यकर्ते नि ” हरवले आहे परिवर्तन असा आशयाचे बॅनर झळकावत जोरदार घोषणा बाजी केली  युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर निदर्शने करण्यापूर्वीच मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांना खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले

असे होणार सिटी पार्क

या प्रकल्पाचे डिझाईन दिल्लीस्थित डिझाईन अकॉर्ड या संस्थेकडून तयार करण्यात आला असून ११४ कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च अपेक्षित आहे.

२६ एकर जागेत सरक्षण भिंत बांधून यात १७०० झाडे लावली जाणार आहेत. यात ९५१ मोसमी व ७० पामची झडे असतील.

१०५४३ चौ मी जागेवर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले जाईल

लहान मुलासाठी १३७८५ चौ मी जागेवर अलबरी, काया. झीगी, क्लाईबर, सिसा, हॉर्स रायडर, बाईक रायडर, मेरी गो राऊड, स्विमिंग पूल 

१२०० बैठक क्षमतेचे प्रदर्शनीय पव्हेलीयन व फॉर्मल गार्डन,

७५० आसन क्षमता असलेले रंगमंच

बांबू थीम रेस्टोरट,

टेक्सटाइल फाब्रिक अम्ब्रेला

स्वच्छता गृहे

सीसीटीव्ही, एलइडी लायटिंग, एटीएमसुविधा, पार्किंग यासारख्या सुविधानि सज्ज असेल

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!