मुंबई

प्रामाणिक रिक्षा चालक व खेरवाडी पोलिसांमुळे  पुणे – मुंबई प्रवासादरम्यान गहाळ झालेले 1 लाखांचे दागिने महिलेला मिळाले परत

ठाणे : रिक्षा चालक चांगले नसतात, उद्धटपणे वागतात, हा समज सय्यद आखिल जाफर यांच्या प्रामाणिकपणामुळे चुकीचा ठरला. जाफर यांच्या प्रामाणिकपणामुळे पुणे – मुंबई प्रवासादरम्यान 1 लाख रुपयांच्या दागिन्यांची गहाळ झालेली बॅग महिलेला परत मिळाली. प्रामाणिकपणे बॅग खेरवाडी पोलिसांना आणून दिल्याने पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन बॅग परत केली.

8 जानेवारी 2019 रोजी पुण्यातील कोथरुड येथे राहणाऱ्या रत्ना श्रीराम वैद्य (५७) अंधेरीत राहणारी मुलगी प्रियंका वैद्य हिला भेटण्यासाठी नीता ट्रॅव्हल्सच्या बसने मुंबईत येत होत्या. वांद्रे येथील कलानगर येथे काही प्रवासी बसमधून उतरले. त्यावेळी त्या प्रवाशांच्या बॅग काढताना वैद्य यांची बॅग बसच्या डिकीतून काढली गेली. गडबडीत ती बॅग तेथेच विसरून बस अंधेरीच्या दिशेने निघून गेली. दरम्यान, ती बॅग रिक्षा चालक सय्यद आखिल जाफर (४८, रा.ठि. इंदिरानगर, रुम न . बि/ ५०६ स्टेशन रोड, वांद्रे पूर्व) यांच्या निदर्शनास पडली. त्या बॅगेत सोने-चांदीचे दागिने होते. सय्यद यांनी ती बॅग खेरवाडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक महादेव भोसले यांच्याकडे आणून दिली.
पोलीस उपनिरीक्षक महादेव भोसले, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी तात्काळ नीता ट्रॅव्हल्सच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून वैद्य यांचा शोध घेऊन रिक्षाचालक सय्यद जाफरी व पोलीस अधिकाऱ्यांनी बॅग परत केली.

गहाळ झालेली दागिन्याची बॅग परत मिळाल्याने वैद्य यांनी रिक्षा चालक सय्यज जाफर व खेरवाडी पोलिसांचे आभार मानले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!