मुंबई

मुंबईकरांचे उद्याही हाल , बेस्ट संप सुरूच राहणार

मुंबई  : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच आहे. संप मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून दबाव आणला जात आहे. आज झालेल्या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळं बेस्टचा संप सुरूच ठेवणार आहे, असा निर्धार युनियनचे नेते शशांक राव यांनी केला. त्यामुळं पाचव्या दिवशीही मुंबईकरांना हाल सहन करावे लागणार आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. संप चौथ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळं मुंबईकरांचे हाल झाले आहेत. मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संपावर ठाम असल्याची भूमिका कामगार संघटनांनी घेतली आहे. युनियनचे नेते शशांक राव यांनी आज कामगारांच्या मेळाव्यातही संपाबाबत भूमिका स्पष्ट केली. महापालिका आणि बेस्ट प्रशासनाकडून संप मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. काल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्तही या बैठकीला उपस्थित होते. आम्ही त्यांच्यासमोर आमच्या मागण्या ठेवल्या. पण पैसा नाही हे एकच उत्तर ऐकायला मिळालं. बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणार नाही. बेस्ट महापालिकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव पालिकेत मंजूर झाला तरी तो राज्य सरकारकडे पाठवणार नाही असं आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आजही मुख्य सचिव, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. पण अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं संप सुरूच राहणार आहे, अशी माहिती राव यांनी या मेळाव्यात दिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!