भारत

आता १फेब्रुवारी पासून १५३ रुपयात १०० चेनल्स पहायला मिळणार — ट्राय

मुंबई :  टीव्हीवरील पसंतीची चॅनेल निवडण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने ग्राहकांना ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढीचा दिलासा दिलेला आहे. आज पुन्हा एकदा ग्राहकांचे हित लक्षात घेवून ट्रायने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनेल फ्री दाखवण्याचे निर्देश ट्रायने केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा पुरवठादारांना दिले आहेत.

ग्राहकांनी टीव्हीवरील १०० चॅनेलची निवड ३१ जानेवारीपर्यंत करायची आहे. १ फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत. केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा पुरवठादारांनी ग्राहकांना प्रति महिना १५३.४० रुपयांप्रमाणे शंभर चॅनेल फ्री दाखवावेत. यात जीएसटीचाही समावेश असेल, असेही ट्रायने म्हटले आहे. या शंभर चॅनेलमध्ये एचडी चॅनेलचा समावेश नसणार आहे. दोन चॅनेलसोबत एक एचडी चॅनेल निवडता येवू शकते, असे काही मीडिया एजन्सीने म्हटले होते. एका चॅनेलसाठी १९ रुपये मोजण्याचा आणखी एक निर्णय ट्रायने रद्द ठरवला आहे. ग्राहकांना पसंतीची चॅनेल निवड करण्याची संधी आहे. जर यासंदर्भात काही अडचण आल्यास ट्रायने फोन नंबरवर संपर्क साधण्याचे ग्राहकांना आवाहन केले आहे.
ट्रायच्या ०११-२३२३७९२२ (ए.के. भारद्वाज) आणि ०११-२३२२०२०९ (अरविंद कुमार) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच
advbcs-2@trai.gov.in आणि arvind@gov.in. या दोन ईमेल आयडीवर काही तक्रार असल्यास ती नोंदवता येवू शकणार आहे, असेही ट्रायने म्हटले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

Advertisements

मुंबई

कोकण

error: Content is protected !!