ठाणे

टोलवाटोलवी अशीही टोलवाटोलवी…. एमआयडीसी निवासी विभागातील रस्ते दुरुस्ती करणार कोण ? मनसेचा खळळखट्याकचा इशारा…

डोंबिवली :- ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी निवासी विभागातील मिलापनगर येथे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. येथील रस्त्याची दुरुस्ती नेमकी करायची कोणी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. येथील रस्ते दुरुस्तीची जबाबदारी पालिका प्रशासनाची असल्याचे एममआयडीसीचे म्हणणे आहे.मात्र पालिका प्रशासन या रस्त्याची दुरुस्ती करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.यावर सोमवारी कार्यकारी अभियंता ननावरे यांची मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या टोलवाटोलवी कंटाळून अखेर मिलापनगर येथील महिलांनी २६ जानेवारीला उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. यावर ही समस्या लवकरात सुटली नाही तर मनसेने खळळखट्याचा इशारा मनसेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

मिलापनगर येथील स्थानिकानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याबाबत वस्तुस्थिती मांडली.त्यानंतरहि परिस्थिती बदलली नसल्याने अखेर महिलांनी पालिकेच्या कार्यालयासमोर २६ जानेवारीला उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली महिला अध्यक्षा मंदा पाटील,शहर सचिव तथा माजी नगरसेविका कोमल पाटील, शहर संघटक स्मिता भणगे, प्रतिभा पाटील, मनीषा पेंडणेकर,मानली पेंडणेकर यासह अनेक महिलाकार्यकर्त्यांनी सोमवारी एमआयडीसी कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.ननावरे यांनी रस्ते दुरुस्तीचे काम पालिका प्रशासनाचे असून सदर निवेदन पालिकेने देऊ असे मनसे महिला शिष्टमंडळाने सांगितले.मात्र यावर मनसे डोंबिवली महिला अध्यक्षा मंदा पाटील यांनी नागरिकांना सोयी-सुविधा मिळाल्या नाहीतर मनसे स्टाईलने उत्तरे देऊ असा इशारा दिला.याबाबत मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांना विचारले असता ते म्हणाले, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिका जर कर वसूल करत असेल तर एमआयडीसी रस्ते दुरुस्त का करेल असा प्रश्न उपस्थित केला होता. येथील आमदार सुभाष भोईर हेही शिवसेनेचे असून नागरिकांनी चार वेळेला या प्रभागात शिवसेनेच्या उमेद्वाला निवडून आणले होते. आता तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्थानिक नागरिकांनी पत्र देऊनही परिस्थिती बदलत नाही. हीच का नागरिकांना पोचपावती म्हणायची का ?

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!