ठाणे

मलनिस:रण वाहिन्याना सक्शन पंप जोडले नसल्याने पाईप फुटण्याचा धोका

डोंबिवली :  कल्याण-डोंबिवली महापालिकेला केंद्र शासनाकडून काही वर्षापूर्वी शहरातील जमिनी अंर्तगत मलनिस:रण वाहिन्या टाकण्याचे काम करण्यासाठठी निधी मंजूर करण्यात आला.मात्र जमिनीअर्तगत टाकलेल्या वाहिन्यांना इमारतीतील सेप्टीक टँकमध्ये जोडणारा मैला वाहून नेणाऱ्या वाहिन्या जोडण्यात आल्या नाहीत.यामुळे जमा होणारा मैला तसास पडून रहातो.याचा त्रास  नागरिकांना मोठया प्रमाणात सहन करावा लागत आहे.पावसाळ्यात तर मैला घरातील तुंबल्यामुळे घरातील पाॅॅटमध्ये परत येण्याचा धोका असतो यामुळे पाईपलाईन फुटण्याचा धोका असून पालिकेने हे काम तातडीने करण्ययाची मागणी नागरिक करत आहेत.

   यामुळे मध्यंतरीच्या काळात महापालिकेने मैला खेचण्याच्या गाडया भाडयाने घेतल्या होत्या.मात्र त्याची मुदत दोन वर्षापूर्वी संपल्याचे सांगण्यात आले.काही निवासी संकूलांनी आपल्या टाक्या खाली करण्यासाठी अर्ज केला असता या गाडया केवळ पाणी खेचून नेण्याचे काम करतात.पण मैला तसार पडून रहातो.परिणामी नागरिंकाना खाजगी गाडी भाडयाने मागवावी लागते.मात्र मर्यादित गाडया असल्याने आठ आठ दिवस या गाडया येत नाहीत त्यामुळे मैला तसाच रहातो व याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला तोंड द्यावे लागते.तसेच ज्या ठिकाणी सेप्टीक टँकची जोडणसी भूमिगत वाहिन्यांना केली त्याला सक्शन पंप न लावल्यामुळे मैला खेचून जात नाही.यामुळे पाईप लाईन फुटण्याचा धोका असतो. यासाठी महापालिकेने जमिनीअंतर्गत मलनि:सारण वाहीन्या टाकल्या नाहीत तेथे टाकाव्यात,मैला साफ करण्यासाठी नवीन गाडया वा भाडयने गाडयाघ्याव्यात व जमिनी अंतर्गत वाहिन्या तातडीने जोडाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.या सदर्भात मलनिस्सारण विभागाचे अधिकारी बबन बरफ म्हणाले डोंबिवलीचे काम अतिम टप्प्यात असून मार्च अखेर पूर्ण काम होईल सध्या मशिनरी बसवण्याचे काम सुरु असून हे काम पूर्ण होईपर्यत प्लान्ट सुरु  करता येणार नाही व मैला उचलता येणार नाही असेही त्यानी स्पष्ट केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!