महाराष्ट्र

मुंबईसह महाराष्ट्रातील डान्सबार होणार सुरू – सुप्रिम कोर्ट

मुंबई ( संतोष पडवळ) : डान्स बार चा परवाना मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं घातलेल्या जाचक अटी सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केल्या. त्यामुळं मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य शहरांत डान्स बार पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात, राज्य सरकारची वेळेबाबतची अट न्यायालयानं मान्य केल्यानं सायंकाळी सहा ते रात्री साडेअकरा या वेळेतच डान्स बार सुरू ठेवता येणार आहेत.

डान्स बार सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं २००५ साली नियमावली जाहीर केली होती. या अटी इतक्या जाचक होत्या की त्यांची पूर्तता होणं जवळपास अशक्य होतं. त्यामुळं सरकारच्या नियमावलीनंतर मागील १३ वर्षांत एकाही डान्स बारला परवानगी मिळू शकली नव्हती. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व डान्स बार बंद झाले होते. सरकारच्या जाचक अटींना विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. सरकारविरोधातील या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयानं सरकारच्या बहुतेक अटी व्यवहार्य नसल्याचं सांगत त्या रद्द केल्या.

या अटी न्यायालयानं केल्या रद्द

> डान्स बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सक्ती करता येणार नाही. या अटीमुळं व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भंग होत असल्याचं खंडपीठानं नमूद केलं.

> बार आणि डान्स फ्लोअर वेगळं ठेवण्याची अट सरकारनं घातली होती. तीही न्यायालयानं रद्द ठरवली

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!