डोंबिवली : फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली खुलेआम शस्त्रास्त्रांची विक्री सुरू असल्याला दुकानावर अचानक धाड टाकून दुकानदाराच्या मुसक्या आवळण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. या दुकानातून तब्बल १७० प्राणघातक हत्यारे हस्तगत करण्यात आली. या शस्त्रमाफिया धनंजय कुलकर्णीला पुन्हा न्यायालयीन कोठडीत सुनावल्यानंतर त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आली आहे.
धनंजय अनंत कुलकर्णी ( ४९ ) असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव असून कल्याण कोर्टात मंगळवारी हजर केले असता कोर्टाने त्याला १५ दिवसांची न्यायालयाने कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी आधारवाडी तुरूंगात करण्यात आली आहे. हा दुकानदार टिळकनगरमधील न्यू दिपज्योत सोसायटीत राहत असून त्याचे मानपाडा रोडला महावीर नगरातील अरिहांत बिल्डिंगच्या तळमजल्यावर तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात प्राणघात हत्यारांचा साठा असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक धाड टाकुन १ लाख ८६ हजार २० रूपये किंमतीच्या शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला होता. दरम्यान ४ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सोमवारी धनंजय कुलकर्णी याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला तर कोर्टाने त्याची रवानगी १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली.
प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्या धनंजय कुलकर्णीला पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी
