कोकण

हाती पाळण्याच्या दोरीबरोबर शिलाई मशीनची दोरी पकडून आदिवासी महिला होतील सक्षम.

कोकण : महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत महिला सक्षम व्हाव्या या उद्दिष्टाने कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून आज आदिवासी व गरीब महिलांसाठी आटगाव येथे शिवण क्लासचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापुन व नारळ वाढवून उद्धाटन करण्यात आले.

कोकण कला व शिक्षण विकास संस्था या संस्थेची २०१२ साली स्थापना झाली. गेली ७ वर्षे शैक्षणिक साहित्य वाटप, विद्यार्थी दत्तक योजना,टेलरिंग कोर्स, नर्सिंग कोर्स, करिअर अकॅडमी, करिअर मार्गदर्शन, सायकल वाटप, रोजगार मेळावे, मेडिकल कॅम्प, विविध स्पर्धा परीक्षा असे वेगवेगळे उपक्रम करण्यात येतात.
आदिवासी महिलांच्या हाताला काम नाही कारण कौशल्य नाही, शिक्षण नाही पण मेहनत करण्यास पुढे असणाऱ्या महिलांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने त्या मागे राहतात. याच विचाराने या उपक्रमाची या विभागात सुरुवात करण्यात आली आहे. असे संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी आपल्या प्रास्तविकात सांगितले

जानू हिवरे म्हणाले की आटगाव सारख्या आदिवासी पाड्यातील महिलांना घरच्या घरी रोजगार निर्मिती साठी कोणतेही साधन किंवा कौशल्य नाही परंतु या विभागात काम करण्यास कोणीही सहसा पुढे येत नाही अशा वेळी कोकण संस्थेने आटगाव येथील आदिवासी महिलांसाठी सुरू केलेले उपक्रम प्रशंसनीय असून येथील महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध होण्यात कोर्स उपयुक्त आहेत.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सह्याद्री सामाजिक संस्था आणि आदिवासी नेते जानू हिवरे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी संजय सावंत उपस्थित होते त्याचबरोबर आटगाव ग्रामपंचायत सदस्य कल्पना सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ नेमसे आदी उपस्थित होते

या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे विश्वनाथ बेटकर, सुरज कदम, पंढरी भाला, पूजा देवकर, विजया मुर्गन, जीपा वीर तसेच मोठ्या संख्येने महिला व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होत

सूत्रसंचालन पंढरी भाला तर आभार दयानंद कुबल यांनी मांडले

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!