गुन्हे वृत्त

बेकायदेशीर २ पिस्टल, गावठी कट्टा, मॅगझीनसह एका इसमास झाँसी उत्तर प्रदेश तर एकास दिवा मुंब्रा येथून अटक

ठाणे : २६ जानेवारी व आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये घातपाती कारवाया होण्याची दाट शक्यता असल्याने प्रतिबंध करण्याकरीता ठाणे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर यांनी सुचना देवुन विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द कारवाई करणेबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या. त्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे इकडील कार्याल्यातील अधिकारी व कर्मचारी त्या अनुषंगाने माहिती प्राप्त करुन घेत होते.

दिनांक १९/०१/२०१९ रोजी रोहीत गुप्ता हा मुंब्रा पोलीस स्टेशनचे हद्दीत गावदेवी मंदिराच्या परिसरात दिवा पश्‍चिम, ठाणे येथे गावठी कट्टा घेवुन येणार असल्याची बातमी पो.हवालदार शरद तावडे यांना मिळाली होती. मिळालेल्या बातमीची खातरजमा करण्याकरीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव व इतर कर्मचारी असे घटनास्थळी रवाना होवुन सदर ठिकाणी सापळा रचुन त्यास शिताफीने दि. १९/०१/२०१९ रोजी १४.३० वा. ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक गावठी देशी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस असे अग्निशस्त्र हस्तगत करुन त्याचे विरुध्द मुंब्रा पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १३/२०१९ भारतीय हत्यार अधिनियम ३,२५(१)(अ) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम३७(१)१३५ प्रमाणे गुन्हयाची नोंद करुन त्यास न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्याची दि. २५/०१/२०१९ रोजी पोलीस कस्टडी रिमांड दिली.रिमांड मुदतीत त्याचे ताब्यात मिळालेला गावठी कटूटा कोठुन घेतला याबाबत विचारणा केली असता त्याने झाँसी उत्तरप्रदेश येथील मुन्ना उर्फ मोहमद इकाम शेख याचेकडुन
घेतल्याचे सांगितले. त्याचे निवेदनाप्रमाणे झाँसी उत्तरप्रदेश येथुन मुन्ना उर्फ मोहमद इकाम शेख यास ताब्यात घेवुन , त्याचेकडुन २,१०,०००/- रु किंमतीचे दोन पिस्टल व एक मॅगझीन असे अग्निशस्त्र हस्तगत करण्यात आले आहे.

सदर कारवाई ठाणे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त, श्री. मधुकर पांडे अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. प्रविण पवार,
पोलीस उप आयुक्त श्री.दिपक देवराज व सहा.पोलीस आयुक्त, श्री.एन.टी.कदम
(गुन्हे शोध–२), यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव व त्यांचे पथकाने केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!