ठाणे

डोंबिवलीतील भगवी दौडमध्ये  ५ हजार स्पर्धक धावले…

डोंबिवली : (शंकर जाधव ) हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त  व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या  जयंतीनिमित्त आज डोंबिवलीत “भगवी दौड “मॅरेथॉन आयोजित करण्यात आली त्यात सुमारे ६५ शाळातील  ५ हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता.१० वर्षांखालील गटा पासून ज्येष्ठ नागरिक यात सहभागी झाले होते.डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकातून सकाळी स्पर्धेला प्रारंभ झाला. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला या प्रसंगी महापौर विनिता राणे , उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे ,डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, संतोष चव्हाण ,किशोर मानकामे , कविता गावंड, मंगला सुळे, किरण मोंडकर ,सुधीर पाटील आदी उपस्थित होते.मुला-मुलींच्या १८ गटात १ किमी ते १२ किमी अशा विविध अत्तराच्या स्पर्धा झाल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी १ किमी स्पर्धा होती. त्यात ज्येष्ठ नागरिकांनी उस्फुर्त भाग घेतला १२ किमी स्पर्धेत प्रथम क्रमांक जगदीश गावडे व महिलांच्या गटात प्रियांका बाईकराव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना रोख रक्कम ,सन्मानचिन्ह,पदक व प्रमाणपत्र देण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!