ठाणे

ठाणे मनपा व कॅनेटिंग हुमॅनिटी यांच्या वतीने फेरीवाल्यांना कागदी पिशव्यांचे वाटप

ठाणे (संतोष पडवळ)- शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर करूनही अनेक भाजीविक्रेते, फळविक्रेते हलक्या प्रतीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरताना दिसत असून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे मनपा आणि कॅनेटिंग हुमॅनिटी यांच्यावतीने जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांनी बनवलेल्या जवळपास 5000 कागदी पिशव्यांचे शहरातील फेरीवाल्यांना वाटप करण्यात आले.

ठाणे मनपाच्यावतीने हिरानंदानी इस्टेटचा काही भाग, ब्रम्हांड आणि वाघबीळ येथील विक्रेत्यांवर प्लास्टिकविरोधात धडक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील सर्व प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या असून जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांनी तयार केलेल्या कागदी पिशव्यांचे या विक्रेत्यांना वाटप करण्यात आले. या मोहिमेचा एक टप्पा पार झाला असून जवळजवळ 5000 पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे.यापुढे ही शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांसाठी सामाजिक बांधिलकी जपत या सर्व विद्यार्थ्यांना अर्थाजनाचे साधन उपलब्ध होण्याकरिता ठाणे महापालिका व कॅनेटिंग हुमॅनिटी यांच्यावतीने या विशेष मुलांकडून १० दिवसात जवळपास ८००० कागदी पिशव्या बनवून घेण्यात आल्या आहेत.

ह्या अभिनव उपक्रमासाठी ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, सिनियर सायंटिस्ट विद्या सावंत,उप स्वच्छता निरीक्षक खिलारे, सिनियर सायंटिस्ट विशाल हिंगे, जागृत पालक संस्थेचे अध्यक्ष सतीश धुरत, सचिव रहीम मुलाणी,प्रवीण देशपांडे, कॅनेटिंग हुमॅनिटीचे महेश ओगले, विकास देशमुख, अमोल पाटणकर, उदय रणदिवे, सुशांत प्रधान,निनाद कर्णिक, उमेश वैद्य,गीतेश कुलकर्णी, हर्षल उज्जैनकर, विजय शेट्टी, स्वरणीम वैद्य, चंदन भोसले, अनीश ओगले,मनिषा प्रधान, निवेदिता प्रधान, आरजे प्रणिता, गौरी पाटणकर आणि सोनल ओगले यांनी विशेष भूमिका बजावली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!