ठाणे

म्हसा याञेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पञकारांना बंदोबस्तावरील होमगार्ड कडून मारण्याची धमकी , वरीष्ठआधिका-यांचे कारवाईचे आश्वासन   

मुरबाड (गितेश पवार मुरबाड ) :  महाराष्ट्रातील प्रसीध्द खांबलिंगेश्वर देवस्थान म्हसोबाच्या याञेचा आज सातवा दिवस तालुक्यातील मानाची म्हसा येथील भगवान शंकराचे अवतार असलेले खांबलिंगेश्वर देवाची याञा दरवर्षी पौष पौर्णिमेला भरली जाते . याञेतील भाविकांना पुरेशा सोईसुविधा पुरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची असते . खांबलिंगेश्वराचे दर्शन भक्तांना सुलभ व्हावेे यासाठी मंदीर व्यवस्थापन समिती कडून विशेष काळजी घेतली जात आहे . तर यात्रेकरूंना सुरक्षित दर्शन खरेदी करता यावी म्हणून पोलिस व होमगार्ड चे कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत . त्याच प्रमाणे याञेतील चांगल्या वाईट घटनांचे वार्तांकन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मिडीया व प्रिंटमिडीयाचे प्रतिनिधी येत आहेत . मात्र बंदोबस्तावरील पोलिस कर्मचा-याऐवजी होमगार्डचे कर्मचारी पञकारांना सहकार्य करण्याऐवजी हातपाय तोडण्याची भाषा करू लागल्या चे दिसून आले आहे . याची तक्रार वरीष्ठ आधिकारी यांच्याकडे करण्यात आली असून त्यांनी कारवाईचे अश्वासन दिले आहे .

म्हसोबा याञेचा आज सातवा दिवस असल्याने याञेचे वार्तांकन करण्यासाठ दैनिक जनादेशचे एडिटर अजय जाधव व त्यांच्या सोबत एक मतिमंद मुलगा , अपंग , वयोवृद्ध अशा तीघांना घेऊन ते जनादेशचे स्थानिक प्रतिनिधी अरुण ठाकरे यांच्या चारचाकी गाडीने यात्रेत जात असताना प्रवेशव्दारावर भास्कर भांडे नावाचा होमगार्ड तैनात होता . यावेळी अरुण ठाकरे व अजय जाधव यांनी गाडी मध्ये अपंग वयस्कर , मतिमंद व्यक्ती असून गाडी आतमध्ये सोडण्याची विनंती केली . मात्र भांडेचा पारा चढला आणि त्यांनी काहीही न ऐकता त्या पञकारांना हातपाय तोडण्याची व मारण्याची धमकी दिली . यावेळी भांडे याच्या सोबत आणखी तीन पोलिस कर्मचारी होते . मात्र त्यांनी त्या होमगार्डला समज देण्याऐवजी त्यांच्या हातातील काठी भांडेकडे देऊन पञकारांना मारण्याचा प्रयत्न केला . याबाबत होमगार्डचे अधिक्षक महेन्द्र चंदणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून त्यांनी कारवाईचे अश्वासन दिले आहे .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!