कोकण

आशीर्वाद क्रिडा संघ महाड लोअर तुडील २०१९ चषकांचे प्रथम मानकरी .. उपविजेता भूमी इलेव्हन रायगड संघ .. 

महाड (सुजित धाडवे ) – देशभरात सर्वत्र क्रिकेट स्पर्धा सुरू झाले असून गावगांवात क्रिकेट खेळाडूंना चढला क्रिकेट फेव्हर यांचे उदाहरण सध्या महाड तालुक्यासह अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गेल्या काही दिवसांपासून होत आहे. ग्रामीण भागासह शहरातील विविध ठिकाणी वास्तव्यास असणारे खेळाडूंनी महाड खाडीपट्टाविभागातील सापे,तुडील, खुटिल येथील अनेक गावांत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि खेळाडूंनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला, दोन दिवसांच्या सुट्टीचा आनंद क्रिकेट प्रेमींनी क्रिकेटच्या मैदानात व्यक्त केला.
           जगदंब खुटील रामवाडी क्रिकेट संघ आयोजित खुटिल रामवाडी ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ व सहकारी मंडळ मुंबई यांच्या विशेष सहकार्याने प्रेम आणि सहनशिलतेचे महामेरू, समाज प्रबोधन संत संगत, परम पुज्य ब्रम्हलीन महात्मा स्वर्गीय सखाराम रामचंद्र सुकूम (गुरुजी) यांच्या स्मरणार्थ  स्मृतीचषक २०१९ चे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खुटील रामवाडी येथे दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेला अनेक क्रिकेट संघासह मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या, एकसंघतेची भावना टिकून राहावी याकरीता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
          गावातील श्री राममंदिर येथे जाऊन हार नारळ अर्पण करून,श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अपर्ण करून, परम पुज्य ब्रम्हलीन महात्मा स्वर्गीय सखाराम रामचंद्र सुकूम (गुरुजी) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मैदानांमध्ये राष्ट्रगीताने क्रिकेट स्पर्धा कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली,मंडळातील गावातील मुंबई येथील पदाधिकारी सदस्य,आयोजक जगदंब संघ यांच्या शुभहस्ते उद्धघाटन करण्यात आले. यावेळी क्रिकेट स्पर्धेला प्रमुख मान्यवर दक्षिण रायगड जिल्हा अधिकारी विकासशेठ गोगावले, महाड तालुका संपर्कप्रमुख इक्बालशेठ चांदले, विभागप्रमुख कृष्णा सुकूम,माजी सभापती महाड सुहेब पाचकर, तालुका सहसंपर्क प्रमुख एकनाथ सुकूम, खुटिल ग्रामपंचायत सरपंच राजेश सुकूम, ग्रामीण अध्यक्ष काशिराम भुवड, माजी अध्यक्ष अशोक कांदळेकर,रामभाऊ सुकूम, सचिन घाणेकर, महाड पोलादपूर कुणबी युवाअध्यक्ष समीर रेवाळे, सचिव संतोष जऊल, सहसचिव मिलिंद चिबडे,सदस्य गजानन कदम, उपविभागप्रमुख शितल विचारे,तालुका संपर्क अधिकारी सचिन राणे, खाडीपट्टा संपर्कप्रमुख अमोल पवळेकर,सुमित तुपट, राहुल पवार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्पर्धेदरम्यान सदिच्छा भेटी देऊन स्वर्गीय सुकूम (गुरुजी) यांच्या जीवनांवर मनोगत व्यक्त केले तसेच भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, तसेच आयोजकांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले,तसेच देणगीदार, मंडप डेकोरेटर्स,क्रिकेट मैदान करण्यासाठी योगदान, पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था, क्रिकेट स्पर्धेमध्ये पंचाचा कामगिरी बजावली अशा अनेक ठिकाणी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानून सत्कार करण्यात आले.
               सदर स्पर्धेत महाड, मंडणगड, मुंंबई, पुणे आदी शहरातील ३२ संघांनी क्रिकेट स्पर्धेला सहभाग नोंदविला, दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत अंत्यत चुरशीच्या व अटीतटीच्या अंतिम सामन्यात आशीर्वाद संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले, भूमी इलेव्हन संघाने निर्धारित तीन षटकात तीन बाद झाले असून ३५ धावांचे लक्ष आशीर्वाद संघासमोर ठेवले.विजयासाठी ३६ धावांचा पाठलाग करताना आशीर्वाद संघास निर्धारित ३ षटकात तीन बळी गेले होते, केवळ ३५ धावांपर्यंत मजल मारता आली,परंतू नाणेफेक जिंकले असल्यामुळे आशीर्वाद संघाला विजयी घोषित करण्यात आले, अशी दोन संघात सामने रंगले, यावेळी विजेता संघ आशीर्वाद क्रीडा संघ लोअर तुडील महाड, उपविजेता संघ भूमी इलेव्हन रायगड, तृतीय क्रमांक जगदंब खुटिल रामवाडी, चतुर्थ क्रमांक वळजाई स्पोर्ट क्लब ओवळे महाड यांनी जगदंब खुटील रामवाडी क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय सखाराम रामचंद्र सुकूम (गुरुजी) यांच्या स्मरणार्थ  स्मृतीचषक २०१९ या चषकावर नाव कोरले, तसेच सामनावीर सर्वोत्तम गोलंदाज /फलंदाज आशीर्वाद क्रीडा संघ लोअर तुडील महाड संघातील उत्कृष्ट गोलंदाज गणेश नामोले,उत्कृष्ट फलंदाज नारायण उमासरे यांनी किताब पटकावला, सदर विजेता संघाला पारितोषिकाच्या स्वरूपात रोख रक्कम वीस हजार एकोणीस रुपये व आकर्षक चषक ,उपविजेता संघाला रोख रक्कम तेरा हजार एकोणीस रुपये आकर्षक चषक , तृतीय क्रमांक रोख रक्कम पाच हजार एकोणीस रुपये आकर्षक चषक सह चतुर्थ प्राप्त संघाला रोख रक्कम दोन हजार एकोणीस रुपये व आकर्षक चषक देण्यात आले तसेच या व्यतिरिक्त सामन्यांमध्ये उकृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज यांची देखील निवड करून त्यांना देखील आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.यावेळी अंतिम फेरीत विजेता उपविजेता संघातील अकरा खेळाडूंना तसेच दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजयी संघातील उत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज कामगिरीबद्दल त्यांच्या खेळाचा गौरव म्हणून आकर्षक पदक देऊन सन्मानित करण्यात आले, असून विजेत्या संघाला अभिनंदन करून खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जगदंब खुटील रामवाडी क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ व सहकारी मंडळ मुंबई, युवा मंडळींनी विशेष सहकार्य लाभले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!