ठाणे

निष्ठावंतांना डावलले जाते…. शिवसैनिकाचा आरोप…… पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत…

डोंबिवली : ( शंकर जाधव) लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा मतदार संघातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्यानंतर पक्षातील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना डावलून आयारामाना  पक्षाने पदांची खिरापत वाटल्याने पूर्वेतील पदाधिकारी कार्यकर्त्यामध्ये नाराजी पसरली आहे. पक्षाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या नंतर पुन्हा एकदा कार्यकर्त्या मधील धुसफूस उघड झाली आहे. शिवसेनेकडून कल्यान लोकसभा मतदार संघात  उपशहरप्रमुख, विधान सभा संघटक या पदावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.अनेक वर्षे पक्षात कार्यरत असलेल्या  निष्ठावंत शिवसैनिकांना डावलले आल्याचा आरोप जुन्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पदाचा राजीनामा देणार आसल्याचेही या शिवसैनिकानी सांगीतले आहे.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख भाई पानवडीकर हे गेली अनेक वर्षे शिवसेनेत आहेत.याआधी शाखाप्रमुख, विभागप्रमुख , ग्राहक संरक्षण कक्षाचे उपशहरप्रमुख अश्या पदावर कामे केली होती.पाच वर्षापूर्वी पानवडीकर यांना शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱयांनी उपशहरप्रमुख पद देण्याचे आश्वासन दिले होते.मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.त्यावेळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच मनधरणी करत पुन्हा एकदा आश्वासन दिले.नुकतेच जाहीर झालेल्या पदांसाठी आपले नाव असल्याचे पानवडीकर यांना सांगण्यात आले होते.परंतु प्रत्यक्षात इच्छुक पदासाठी आपले नाव जाहीर झाले नसल्याने ते नाराज झाले आहे.आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठ पदाधिकारी आणि डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्याकडे देणार आल्याचे पानवडीकर यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!