ठाणे

अण्णा हजारे हे जनतेचा आवाज उपोषणाच्या माध्यमातून समोर आणतात.. — भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे

डोंबिवली : ( शंकर जाधव ) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उपोषणाला बसले असून उपोषणाबाबत भाजप प्रदेश रावसाहेब दानवे यांनी   भाजप सरकारची भूमिका स्पष्ट केली.ज्या मुद्द्यावर त्यांचं उपोषण सुरू आहे, त्याबाबत सरकार सकारात्मक आहे.. पुढच्या काळातही आमचे प्रतिनिधी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील.अण्णांवर पैसे घेतल्याचे आरोप करणं चुकीचं आहे, अण्णांनी आजवर कधीही असे पैसे घेतलेले नाहीत. ते निस्वार्थीपणे जनतेची सेवा करतात आणि जनतेचा आवाज उपोषणाच्या माध्यमातून समोर आणतात.अण्णा भाजपच्याच विरोधी उपोषण करत नाहीत, याआधीही त्यांनी असं उपोषण केलेलं आहे, त्यांचा आपला एक अजेंडा असल्याचे दानवे यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात सांगितले.

     महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने स.वा.जोशी शाळेच्या पटांगणात असंघटीत व नाका कामगारांचा भव्य कुटुंब मेळावा व संघटनेचा ६ वा वर्धापन दिन सोहळापार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपीठावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण,शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे,शहरप्रमुख राजेश मोरे. उपशहरप्रमुख किशोर मानकामे,उपशहरसंघटक संजय पावशे,शिवसेना महिला पदाधिकारी किरण मोंडकर,कविता गावंड, मंगला सुळे, प्रकाश म्हात्रे,मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, कैलाश काकडे, नामदेव भानुसे,रामेश्वर सेजूळ, भीमराव गुंड,जालना जिल्ह्यातील भोपरदन तालुका प्रमुख माधवराव हिवाळे, जालना जिल्हा परिषद सदस्य कैलाश पुंगळे आदी उपस्थित होते.यावेळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारने कामगारांसाठी विविधयोजना अंमलात आणल्या असल्याचे सांगितले. पुढे भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, भाजप सरकार हे शेतकऱ्यांचे,गरीबांचे सरकार आहे,कॉंग्रेस सारख्या सुटाबुटातील नाही.आधीच्या सरकारमध्ये शेतकर्यांना आधार मिळत नव्हता. मात्र आमच्या सरकार हे गरिबांकडे लक्ष देत आहे.नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर संसदेत पहिल्यांदा बोलताना आमचे हे सरकार गरिबांना समर्पित करत आहोत असे सांगितले.यावेळीवैभव राणे यांची महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष याची निवड झालायाबद्दल दानवे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत यांनी  शिवकालीन पोवाडे सादर केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!