ठाणे

परिवहन निवडणुकीत शिवसेना – भाजप युतीचे सहाही उमेदवार विजयी 

डोंबिवली  :- कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या  परिवहन समिती च्या निवृत्त सहा जागांसाठी आज  झालेल्या निवडणुकीत शिवसेना ३ आणि भाजपाचे ३ सदस्य निवडून आले.दरम्यान सहाव्या जागेसाठी भाजप आणि मनसेच्या उमेदवाराला समान मते होती यावेळी महापौरांच्या निर्णायक मत भाजपच्या पारड्यात टाकल्याने भाजप चा उमेदवार निवडून  आला तर मनसेच्या उमेदवाराला निसटता  पराभव वाट्याला आला.
          कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या  निवृत्त सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने सुनील खारुक, अनिल पिंगळे, बंडू पाटील यांनी तर भाजपच्यावतीने संजय मोरे, स्वप्नील काठे, दिनेश गोर यांनी अर्ज दाखल केले होते. तर मनसे  वतीने मिलिंद म्हात्रे यांनी अर्ज दाखल केला होता. .मनसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी मतांवर डोळा ठेवत निडवणूक रिंगणात उडी घेतल्याने सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होतीआज पालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. १२० नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये शिवसेना – भाजप युतीचे सहाही उमेदवार विजयी झाले. सहाव्या जागेसाठी भाजपचे दिनेश गोर आणि मनसेच्या मिलिंद म्हात्रे या दोघात झालेल्या अटी तटी च्या लढतीत दोघांना समान ९६ मते मिळाली. मात्र पीठासीन अधिकारी असलेल्या महापौर विनिता राणे यांनी आपले निर्नायक मत गोर यांच्या पारड्यात टाकल्याने म्हात्रे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
 शिवसेना 
सुनील खारूक -112
अनिल पिंगळे – 97
बंडू पाटील – 106
——————————————————————-
भाजप
संजय मोरे – 108
स्वप्निल काठे – 105
दिनेश गोर – 96

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!