कोकण

 ७ हजारांची लाच घेताना गुहागर येथील महाविद्यालयातील दोन लिपिकांना ACB कडून अटक

रत्नागिरी  : सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन आणि भविष्य निर्वाह निधीची कागदपत्रे पूर्ण करुन ती मंजूर करुन घेण्यासाठी ७ हजार रुपयाची लाच घेताना गुहागर येथील एका महिविद्यालयातील दोन लिपिकांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार) दुपारी पावणे दोनच्या सुमारास महाविद्यालयात करण्यात आली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ लिपिक उदय वसंत रावणंग (वय ४७) आणि कनिष्ठ लिपिक राजेश महादेव खामकर (वय ४८) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. याप्रकरणी तक्ररारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदाराकडे निवृत्तीवेतन आणि भविष्य निर्वाह निधीची सर्व कागदपत्रे पूर्ण करून ती जिल्हापरिषद शिक्षण विभागाकडून मंजूर करून घेण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून दुपारी पावणे दोन वाजता सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!