कल्याण : (संतोष पडवळ) ; कल्याण डोंबिवलीमधील महापालिकेच्या परिवहन सेवेचा कंडक्टर प्रवाशांच्या तिकीटाच्या पैशांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष पथकाने अचानक केलेल्या तपासणीत ही बाब समोर आली आहे.
परिवहन सेवेच्या बसेस नेहमी तुडुंब भरलेल्या असतात.मात्र त्यांचे उत्पन्न मात्र कमी होत चालले आहे.याविरोधात केडीएमटीचे महाव्यवस्थापक मारुती खोडके यांनी एका विशेष भरारी पथकाची स्थापना केली होती. या पथकाने 19 फेब्रुवारी रोजी कल्याण-पनवेल बसवर अचानक धाड टाकली असता कंडक्टरची तपासणी केली.यावेळी विकल्या गेलेल्या तिकिटांच्या तुलनेत त्याच्याकडे 817 रुपये जास्त आढळले होते.विशेष म्हणजे हे पैसे लपवण्यासाठी त्याने पँटच्या चेनच्या शेजारी एक छोटा चोरकप्पा तयार केला होता.त्यामध्ये त्याने ते पैसे लपवले होते.त्यावेळी भरारी पथकाने त्याला अक्षरश: कपडे काढून बसवले आणि त्याची तपासणी केली होती.त्यावेळेस हा प्रकार उधडकीस आला आहे.
दरम्यान या प्रकारानंतर केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांमुळेच केडीएमटी सेवा तोट्यात चालली असल्याचे समोर आले आहे.त्यावेळी कल्याण डोंबिवलीकरानी याविषयी संताप व्यक्त करत आहेत.या प्रकारानंतर कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे.तसेच ही तपासणी यापुढेही सुरु राहणार असल्याची माहिती परिवहन समिती सदस्य मनोज चौधरी यांनी दिली आहे.