पुणे : कर्णबधिरांची बाजू मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडेल. असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयासमोर पोलिसांकडू झालेल्या कर्णबधीर आंदोलकांवर लाठीचार्ग नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
राज्यभरातून तीन ते चार हजार कर्णबधीर पुण्यात आले होते. यावेळी पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर आज सकाळपासून आंदोलन करत होते. समाज कल्याण आयुक्तांकडून त्यांच्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर मुंबईपर्यंत पायी चालत जाण्य़ाचा निर्धार त्यांनी केला होता. दरम्यान त्यांच्या मुंबईपर्यंत चालत जाण्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. त्यासोबतच त्यांची धरपकड सुरु केली. काही काळ समाज कल्याण आयुक्तालयासमोर चांगलीच धांदल उडाली होती. यात अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. या सर्व प्रकारानंतर काही आंदोलक तेथे ठाण मांडून बसले. त्यावेळी आंदोलकांना राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली होती. आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भेट दिली आहे.
दरम्यान, सरकारला यासंदर्भात काही देणंघेणं नाही, निवडणूक फक्त पैशावर जिंकन हे त्यांचं चालू आहे. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर कर्णबधिरांची बाजू मांडेल. असे आश्वासनही त्यावेळी राज ठाकरे यांनी दिले. इतकेच नव्हे तर, हे मूल आता रात्रभर इथे आहेत. न जेवता ते इथेच थांबणार आहेत असे त्यांना विचारले असता. या सर्वांची व्ययस्था करण्यासाठी मी माझ्या माणसांना सांगेल असेही त्यांनी म्हंटले.