ठाणे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ शहर युवक काँग्रेस कमिटी व सत्यसाई प्लॅटीनियम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबिराला”नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबरनाथ दि. २४ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
          अंबरनाथ शहर युवक काँग्रेस कमिटी व सत्यसाई प्लॅटीनियम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त “मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबिर” अंबरनाथ पश्चिमेकडील इंदिरा भवन, कैलासनगर याठिकाणी करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबिराला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती आयोजकांनी दिली.
            याप्रसंगी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी, मिलिंद पाटील, पंकज पाटील, सुरेंद्र यादव, सुभाष पाटील, विजयन नायर, संकेत तांबे, सूर्यकांत जोशी, हर्षद भोईर, रोहित प्रजापती, विकास सोमेश्वर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           या शिबिरात ईसीजी, रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. सोनोग्राफी, एक्सरे, टू-डी युक्को आदी तपासणी या शिबिराच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या असून एनजीओग्राफी, बायपास, किडनी स्टोन, व्हॉल रिप्लेसमेंट, फेक्चर, प्रोस्टेट सर्जरी आदी शस्त्रक्रियाही हॉस्पिटलमध्ये या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
            अंबरनाथ शहर युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने “मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याचबरोबर लवकरच युवक काँग्रेसचे वतीने भव्य रोजगार मेळावा देखील आयोजित करण्यात येणार असल्याचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!