भारत

महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिका-यांना गृहमंत्री पदक

 

नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिका-यांना गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आज 25 राज्य, केंद्रशासित प्रदेश व केंद्रीय तपास यंत्रणेत कार्यरत असणा-या 101 पोलीस अधिका-यांना गृहमंत्री पदक जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील 11 पोलीसांचा यात समावेश आहे. मध्य प्रदेशातील 11 पोलीस अधिकारी, सीबीआयचे 9 अधिकारी तसेच राजस्थान व उत्तर प्रदेशातील प्रत्येक 7 पोलीस अधिका-यांचा यात समावेश आहे. देशातील 12 महिला पोलीस अधिका-यांनाही गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्रातील खालील पोलीस अधिका-यांना गृहमंत्री पदक जाहिर झाले आहे.

राज तिलक रोशन ( पोलिस उपायुक्त), दिपक पुंडलिक देवराज (पोलिस उपायुक्त), सुरज पांडुरंग गुरव (पोलिस उपाधिक्षक), रमेश नागनाथ चोपडे( सहाय्यक पोलिस आयुक्त), दिनेश विठ्ठलराव आहेर (पोलिस निरीक्षक), शशिराज गुंडोपंत पाटोळे ( पोलिस निरीक्षक), चिमाजी जगन्नााथ आढाव ( पोलिस निरीक्षक), सुरज जयवंत पडावी ( पोलिस निरीक्षक), सुनिल किसन धनावडे ( पोलिस निरीक्षक), सचिन मुरारी कदम (पोलिस निरीक्षक) आणि धनंजय चित्तधरंजन पोरे (सहाय्यक पोलिस निरीक्षक) यांचा समावेश आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!