कोकण मुंबई

रत्नागिरीतील वादग्रस्त नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द

मुंबई :  रत्नागिरी जिल्ह्यातील वादग्रस्त नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याची घोषणा आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या गावकऱ्यांच्या जमीनी त्यांना परत करण्यात येणार आहे. तसेच ज्या गावाला हा प्रकल्प व्हावा असे वाटते, त्या गावात तो सुरू करण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले. हा प्रकल्प रद्द व्हावा यासाठी शिवसेनेने भाजपवर दबाव आणला होता.

शिवसेना-भाजप युतीची घोषणा करण्याकरिता जी पत्रकार परिषद झाली होती, त्यात मुख्यमंत्र्यांनी नाणारबाबतही घोषणा केली होती. नाणार प्रकल्प हा लोकांची मान्यता असेल त्याठिकाणी हलवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. आज याबाबतची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. नाणार प्रकल्पासाठी निघालेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुभाष देसाई यांनी जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प रद्द करण्याच्या अधिसूचवेवर सह्या देखील केल्या.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर राजापूरतालुक्यातील नाणार येथे हा तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार होता. २०१५ साली या प्रकल्पाची राज्य सरकारने घोषणा केली होती.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!