ठाणे

कपलिंग तुटल्याने पंचवटी एक्स्प्रेसचे दोन डब्बे इंजिनसह पुढे  

कल्याण : कपलिंग तुटल्यामुळे मनमाड मुंबई पंचवटी एक्स्प्रेस अर्धे डबे मागे ठेवून धावल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणात घडला. कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान पत्रीपुल परिसरात हा प्रकार घडला. त्यामुळे ऐन सकाळच्या वेळेस जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.  त्याचा धीम्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

 मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसने कल्याण स्टेशन सोडले आणि गाडी पत्रीपुल परिसरात आली. मात्र पत्रीपुल ओलांडताच कपलिंग तुटल्याने इंजिनासह २  डबे पुढे गेले आणि उर्वरित गाडीचे डबे पाठीमागेच राहिले. या प्रकाराने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने गाडी थांबवली. मात्र याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता.  जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने धीम्या मार्गावर त्याचा ताण आला.

या घटनेनंतर तब्बल दोन तासांनंतर नविन इंजिन लावून पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली. यानंतर जलद अप मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!