मुंबई

मुंबईकरांच्या सुखकर रेल्वे प्रवासासाठी एमयूटीपी ३ अ प्रकल्पाला मान्यता*

मुंबई : प्रतिनिधि -( संतोष पडवळ) केंद्रातील मोदी सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीआधी मुंबईकरांना खूश करण्यासाठी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. मुंबईकरांच्या सुरक्षित आणि सुखकर रेल्वे प्रवासासाठी एमयूटीपी ३ अ प्रकल्पाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या तब्बल ३३,६९० कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे उपगनरीय रेल्वेचा कायापालट होणार आहे.

पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे स्थानकांवर नव्या रेल्वेमार्ग, अधिक चांगल्या सिग्नल यंत्रणा, स्थानकांचा विकास एसी लोकल आदी सुविधा या प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणार आहेत. मुंबई आणि उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातल्या लोकांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे.
प्रकल्पांतर्गत होणारे लाभ

> लोकल ट्रेनच्या संख्येत वाढ
> स्थानकांचे नूतनीकरण
> १९१ नव्या एसी ट्रेन
> हार्बर मार्गावर गोरेगाव ते बोरिवली ७ कि.मी.चे विस्तारीकरण
> सीएसएमटी ते पनवेल जलद रेल्वे मार्गिका
> पनवेल-विरार रेल्वे मार्गिका
> बोरीवली-विरार पाचवी आणि सहावी मार्गिका
> कल्याण-आसनगाव चौथी रेल्वे मार्गिका

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!