ठाणे

स्वमग्न विद्यार्थ्याची नृत्याच्या माध्यमातून देशभक्ती …. 

डोंबिवली :- ( शंकर जाधव ) स्वतःच्या दुनियेत मग्न असलेल्या स्वमग्न विद्यार्थ्यांनी गाणी आणि नृत्याच्या माध्यमातून दाखवून दिलेली देशभक्ती पाहून उपस्थितांच्या डोळे पाणावले होते.`माॅ तुझे सलाम, जलवा तेरा जलवा, ये दुनिया दुल्हन,संदेश आते हे` अश्या देशावरील गीतांवर नृत्य करताना पाहून ही मुले सामान्य मुलांसारखीच नुत्य करत असल्याचे दिसले. याचे सर्व श्रेय संतोष इन्स्टिट्यूट ऑर मेंटली चॅलेंज संस्थेच्या शाळा व्यवस्थापन,शिक्षणवर्ग आणि कर्मचाऱ्यांचे असल्याचे यावेळी पालकवर्गानी सांगितले.डोंबिवलीत संपन्न  झालेल्या संस्थेच्या ११ व्या वर्धापन दिनी स्वमग्न विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असलेले कलागुण सादर केले.

    संतोष इन्स्टिट्यूट ऑर मेंटली चॅलेंज संस्थेच्या मुंबई आणि उपनगर परिसरात ११ शाळा आहेत. डोंबिवलीतहि स्वमग्न मुलांसाठी शाळा सुरु केल्याने अश्या मुलांना दैनदिन जीवनात आपण कोणावरही अवलंबून राहू नये म्हणून प्रशिक्षण देण्यात येते. तसेच शाळा असल्याने ज्ञानाबरोबर विविध खेळी शिकविले जातात.संस्थेचे संचालक दत्ताराम कोंडे, मुख्याध्यापिका कांचन पवार, वंदना रावराणे, संतोष बंगने,स्मिता डोर्लेकर,स्नेहल बाईट,तेजश्री माने,जागृती वाघे आणि सुरज धुमाळ,विजेंद्र चित्ते, तुषार वेले हे शिक्षकवर्ग आणी कर्मचारी वर्ग यांच्या अथक मेहनतीने आज हे विद्यार्थी स्टेजवर कोणाचाही आधार घेता आपली कला सादर करू शकतात. डोंबिवली पूर्वकडील रोटरी स्कूल ऑफ डेफ च्या सभागृहात पार पडलेल्या संस्थेच्या ११ वा वर्धापनदिन सोहळ्यात स्वमग्न मुलांनी विविध खेळ सादर केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनसे नगरसेवक मंदार हळबे, समाजसेवक आनंद डिचोलकर उपस्थित होते.देशावर आधारित असलेल्या गीतांवर संस्थेच्या मीरा रोड येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम नृत्य सादर केले. यावेळी नगरसेवक मंदार हळबे म्हणाले, मी अनेक कार्यक्रमात जात असलो आज या कार्यक्रमात आल्यावर या विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या कला पाहून दंग झालो. या मुलाच्या पाठीशी असलेल्या  संतोष इन्स्टिट्यूट ऑर मेंटली चॅलेंज संस्थेचे कौतुक करतो.समाजात आपण अश्या मुलांना प्रोत्साहन देणे, त्यांना आपल्यातीच एक आहेत, त्यांना आधार देणे हे महत्वाचे आहे. येथे उपस्थित असलेल्या सर्व पालकवर्गाना कोणतीही मदत लागण्यास समाज त्यांच्या पाठीशी उभा आहेत.तसेच उपस्थित पालकवर्गानी संस्थेचे आभार मानत आपला  पाल्य स्वतःची कामे स्वतः करू शकतो असे यावेळी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!