ठाणे

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालका मंडळाच्या निवडणुकीत मनसेची पेरणी कोणासोबत  ?     

डोंबिवली :- ( शंकर जाधव ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष ताकद राज्यात दिसेल, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये हि ताकद दिसू शकते असे भाकीत नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी  केले आहे. मात्र कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत मनसेचा पेरणी कोणासोबत ?   याबाबत असा संभ्रम निर्माण झाला आहे.यामुळे या निवडणुकीत मनसेची ताकद दिसणार का याबद्दल शंका निर्माण केली  जात आहे. कल्याण तालुक्यात मनसेच्या एका नेत्याचा आणि त्यांच्या  ज्येष्ठ बंधुंचा  दबदबा आहे. शैक्षणिक संस्था, बांधकाम व्यवसायिक, राजकिय पुढारी यांच्यामध्ये या बंधूंच्या शब्दांना किमंत आहे.त्यामुळे मनसेची साथ ज्या पक्षाला मिळेल त्या पक्षाचा सभापती बनेल अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते बाजार समितीच्या निवडणुकीला राजकीय महत्व आल्याचे दिसून आले.

      बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपची युती आहे. तर शिवसेनेचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे.कॉंग्रेसने मात्र`एकला चलो रे`भूमिका घेतली आहे.या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ कोणाला अशी जोरदार चर्चा सुरु आहे.एका उमेदवाराने मनसे कॉंग्रेसला साथ देत असल्याचे सांगितले आहे.कल्याण तालुक्यातील मनसेची वजनदार मंडळी कॉंग्रेसबरोबर असल्याचे ठामपणे सांगितले. तर दुसरीकडे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेल्या मनसेच्या एका उमेदवाराने राष्ट्रवादी- भाजपा बरोबर मनसे असल्याचे सांगितले.कल्याण तालुक्यात दक्षिणेकडील भागात काँक्रीटच्या जंगलाने व्यापले आहे.त्यामुळे शेतकरी आणि शेते राहिलेली नाही. उदयाला आलेले बांधकाम व्यावसायिकांना अचानक या बाजार समितीच्या निवडणुकीत रस का आला याची चर्चा रंगली.मनसेच्या २००७ साली स्थापना झाली. मनसेने लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरले होते. मात्र यंदा प्रथमच मनसेने बाजार समितीच्या निवडणुकीत आपले नशीब आजमायचे ठरवून प्रचार सुरु केला. `एकला चलो रे` असे न करता इतर पक्षाला साथ देत याला खाते उघडणार का हे निकालानंतर समजले.

    कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवसेनेची साथ सोडून समितीत आपला झेंडा फडकविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीबरोबर युती केली आहे.आघाडीतील कॉंगेस पार्टीला या निवडणुकीत एकटे सोडले. तर निवडणुकीत मनसेला खाते उघडण्यासाठी छुपी युतीची चाल कमी येईल का यावर राजकीय वर्तुळात रंगत आहे.  

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!