ठाणे

कवियत्री सुलभा कोरे यांच्या हिंदी  कविता संग्रहाला एक लाखाचा पुरस्कार..

  डोंबिवली :- ( शंकर जाधव  ) डोंबिवलीतील प्रसिद्ध कवियत्री सुलभा कोरे यांच्या हिंदी कविता संग्रह ‘तासिर`’ला हिंदी तर भाषी हिंदी लेखक पुरस्कार रुपये एक लाख जाहीर झाला आहे. केंद्रीय हिंदी निदेशालय विभागाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने काल त्याना एक पत्र पाठवून वरील घोषणा केली आहे. केंद्रीय हिंदी निदेशालय मानव संसाधन विभागाने हिंदी भाषेतर लेखक पुरस्क्ार २०१७ चा हा पुरस्क्ाार जाहीर केला आहे.सुलभा कोरे यंानी यांच्या ‘स्पर्शिका,स्पर्श हरवलेले’या मराठी कविता संग्रहासह ‘एक नया आकाश’हा हिंदी कविता संग्रह प्रकाशित झाला आहे.गेली २५ वर्षे त्या विविध मराठी व हिंदी वृत्तपत्रात,मासिकातून विविध विषयावर लेखन करत आहेत. डोंबिवलीत गेली तीन दशके असलेल्या काव्य रसिक मंडळाच्या संस्थापिकापैकी एक आहेत.त्यांना एक लाखाचा पुरस्कार जाहीर झाल्याने स्वागत करण्यात येत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!