मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर फलाट १ वर पादचारी पूल कोसळला

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज संध्याकाळी हिमालया पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅबच खाली कोसळल्याने त्यात दोघांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत २० जखमी झाले आहेत. शिवाय या पुलाच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईच्याबाहेर जाणारे मार्ग बंद करण्यात आल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे.

आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सायंकाळी कामावरून सुटल्याने चाकरमानी या हिमालया पुलावरून जात असताना अचानक हा पूल कोसळला. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅब खाली कोसळल्याने त्याबरोबर पुलावरून चालणारे चाकरमानीही खाली कोसळले. त्यामुळे अनेकजण सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. पूल कोसळल्यानंतर जोरदार आवाज आल्याने एकच घबराट पसरली. या पुलाचा स्लॅब एका टॅक्सीवर कोसळल्याने या टॅक्सीचा अक्षरश: चेंदामेदा झाला आहे. पूल कोसळल्यामुळे पुलाखालून जाणारी वाहतूकही तात्काळ थांबवण्यात आली. सीएसटी परिसरातील पादचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी जाऊन धाव घेत मदत कार्यास सुरुवात केली आहे. यावेळी बघ्यांनीही दुर्घटनेस्थळी प्रचंड गर्दी केल्याने मदत कार्यात अडथळे येत होते.

दरम्यान, या दुर्घटनेत दोनजण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत २० जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी १० जणांना सेंट जॉर्ज रुग्णालयात आणि १० जणांना जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे
ही दुर्घटना झाल्याचं कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ रस्ता बंद केला. त्यामुळे मुंबईहून दादरच्या दिशेने जाणारी आणि मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!