ठाणे

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी प्रक्रियेबाबत गोंधळ… आजच मतमोजणी करण्याची शिवसेनेची मागणी .

कल्याण :   कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक ठाणे जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.या निवडणुकीत एका गणातील मतपेटी जळाल्याने सर्व गणातील मतमोजणी सोमवारी करण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांना पत्र देऊन कळविले आहे.मात्र शिवसेनेने यावर आक्षेप घेत ज्या गणातील मतपेटी जळाली आहे, त्या गणांची मतमोजणी थांबवली तरी चालेल परंतु इतर गणातील मतमोजणीचा निकाल सोमवारीच करावी अशी शिवसेनेच्या 13 उमेदवारांनी जोरदार मागणी केली.मात्र मतमोजणी स्थगित केली असून शिवसेनेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्याचे येईल असे सहाय्यक निवडणूक अधिकारी श्यामकांत साळुंखे यांनी सांगितले.दरम्यान या निवडणुकीच्या मतमोजणीबाबत गोंधळ उडाला असून यावर प्रशासन नक्की काय भूमिका घेईन यावर चर्चा सूरु झाली आहे.तसेच काही उमेदवारांनी मतपेटी सुरक्षित नसून प्रशासकीय अधिकारी शांत बसल्याचा शिवसेनेच्या उमेदवारांकडून होत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!