ठाणे

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शिवसेना 8,भाजप 6 ,राष्ट्वादी 3 आणि मनसेचा 1 उमेदवार विजयी…..

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकित एकूण १८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. १६ जागांसाठी १२१ गावांमधून मतदान झाले होते. या निवडणूकी शिवसेना नेत्यांच्या पाठींबा दिलेले ८ उमेदवार विजयी झाले तर भाजप नेत्यांनी पाठींबा दिलेले ६, राष्ट्रवादीचे ३ आणि मनसेचा १ उमेदवार निवडून आले कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत एका गणातील एक मतपेटी जळाली होती.यामुळे गट क्र.12 मध्ये फेरनिवडणूक झाली होती. या गणात आमदार गणपत गायकवाड समर्थक उमेदवाराचा विजय झाला. कल्याण कृषी उत्पन्न बाजा तेथे मनसेचे गजानन पाटील विजयी झाले.तर मुरबाड विधानसभा क्षेत्रात येेेणाऱ्या गटात आमदार किसन कथोरे समर्थक विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत एकत्र येऊन लढणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर मात्र कलगीतुरा सुरूच असून ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील शेतकरी मतदारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेचा पाडाव करण्यासाठी भाजपने थेट राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे आता सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!