ठाणे

डोंबिवलीतील कॉंग्रेसमधील गटबाजी आणि कार्यकर्त्यामधील रुसवा… आघाडीच्या उमेद्वाराच्या प्रचारातील आडकाठी

डोंबिवली : ( शंकर जाधव  ) कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडून कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बाबाजी पाटील यांनी  कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याशी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. रविवारी सायंकाळी डोंबिवलीतील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा कार्यालयात कार्यकर्त्याशी संवाद साधताना `मला तुमची साथ हवी` असे साकडे घातले.यावेळी प्रथमच आगरी समाजातील आणि ठाण्यातून आयात न केलेला उमेदवार आघाडीने उभा केला आहे.त्यामुळे यावेळी नक्की विजयाची माळ गळ्यात पडेल अशा विश्वास पाटील यांनी  व्यक्त केला. मात्र डोंबिवलीतील कॉंग्रेसमधील गटबाजी आणि कार्यकर्त्यामधील नाराजी हे बाबाजी पाटील यांना प्रचारासाठी आड येऊ शकते असे कॉंग्रेसमधील काही कार्यकर्त्याचे म्हणणे आहे.

    कॉंग्रेस नगरसेविका हर्षदा भोईर आणि पदाधिकारी एकनाथ म्हात्रे यांच्या कार्यालयात आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी संतोष केणे, जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे,माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर,नगरसेविका हर्षदा भोईर,एकनाथ म्हात्रे, अभय तावडे,पमेश म्हात्रे, राहुल केणे,प्रणव केणे, बेबी परब, अजय पौळकर,विजय लेले, राजेश म्हात्रे,गौरव माळी, भावेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बाबाजी पाटील यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्याशी संवाद साधताना स्थानिक भूमिपुत्राला उमेदवारी दिल्याने मला कॉंग्रेस कार्यकर्त्यांची साथ हवी असे सांगितले. कार्यकर्त्यांनी यावर आमची साथ असून जोरदार प्रचार करू असे आश्वासन दिले. कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत कॉंग्रेसचे चार तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे दोन नगरसेवक निवडणूक आले आहेत. त्यातील कॉंग्रेसचे तीन नगरसेवक डोंबिवलीत तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक कल्याण मधील आहेत.त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत कॉंग्रेसची तशी ताकद मोठी नाही. त्यात डोंबिवलीतील कॉंग्रेसमधील गटबाजी आणि कार्यकर्त्यामधील नाराजी हे बाबाजी पाटील यांना प्रचारासाठी आड येऊ शकते असे कॉंग्रेसमधील काही कार्यकर्त्याचे म्हणणे आहे.त्यामुळे बाबाजी पाटील यांना डोंबिवलीतील कॉंग्रेसमधील गटबाजी आणि कार्यकर्त्यामधील रुसवा काढून टाकण्यात यश आल्यास त्याचा थोडाफार फायदा होण्याची शक्यता आहे.मध्यतरी कॉंग्रेसच्या अंतर्गत बैठकीत गटबाजी उघडपणे दिसून आली होती. कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार कितीही लपविण्याचा प्रयत्न केला असला असला तरी कार्यकर्त्यामध्ये यावर चर्चा सुरु होती. काही महिन्यापूर्वी कॉंग्रेसच्या एका बैठकीत निरिक्षकांसमोर कल्याण मधील दोन पदाधिकाऱ्यांनी आपल्यातील मतभेद संपल्याचे जाहीर केले होते. तर त्यावेळी नियोजनाचा आभाव असल्याने निरीक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.या सर्व प्रकारामुळे बाबाजी पाटील यांना कॉंग्रेसमधील मतभेदाची माहिती ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून मिळवून घेणे आवश्यक आहे.यावर वेळीच उपाय शोधणे आवश्यक असल्याचे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये बोलले जात आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!