ठाणे

कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत हिंदी भाषिकांची मते अपक्ष उमेदवाराचे नशीब बदलेल का ?

डोंबिवली : ( शंकर जाधव ) कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत यंदा अपक्ष उमेदवाराने नशीब आजमावण्याचा ठरवले आहे.या मतदार संघात हिंदी भाषिक मते निर्णायक असल्याने यंदाच्या निवडणुकीत समाजाचे अस्तित्व दाखविण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून देवेंद्र सिंह यांनी निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे.शिवसेना हिंदी भाषिक समाजाला आश्वासन देऊन निवडणूक आल्यावर विसरून जात असल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे सिंह यांनी सांगितले.

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ,विठ्ठलवाडी, उल्हासनगर,दिवा, मुंब्रा, कळवा या शहरात हिंदी भाषिक २ लाखापेक्षा जास्त आहेत.ही मते कधीही एका पक्षाकडे वळली नाहीत. आघाडी आणि युती अश्या दोन्ही उमेदवारांकडे हिंदी भाषिकांनी हात दिला होता. यंदा आपल्या समाजातील उमेदवार कोणत्याही पक्षातून उभे न राहता समाजाचे अस्तित्व दाखविण्यासाठी रिंगणात उभे राहिल्याने या समाज या उमेदवाराच्या पाठीशी किती उभा राहील हे निवडणुकीच्या निकालानंतर समजेल.डोंबिवली तशी हिंदी भाषिक मते जास्त नसली तरी इतर शहरात या समाजाने आपला चेहरा समोर आणला आहे.हिंदी भाषिक समाज आजवर कॉंग्रेस आणि शिवसेनेवर विश्वास ठेऊन त्याच्या बरोबर उभा होता. मात्र यंदा आपल्यातील उमेदवार उभा राहिल्याने हिंदी भाषिक समाज याचा नक्की विचार करेल.`आश्वासन नको,विकास हवा`हा मुद्दा समोर ठेवून देवेंद्र सिंह यांनी हिंदी भाषिकांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय हे काही दिवसात समजेल. या समाजाला आपल्या हक्काचा एक उमेदवार मिळाला असून इतर समाज एकत्र येऊ शकतो तर हिंदी भाषिक समाज एकत्र आला तर समाजाच्या विकासासाठी आणि कोणाकडे आशेने पाहण्याची वेळ येणार नाही असे या उमेदवाराचे म्हणणे आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!