महाराष्ट्र

पुण्यात स्वारगेटजवळ शंभर वर्षापूर्वीची दोन भुयारं आढळली

पुणे : स्वारगेट येथे मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या स्टेशनचे काम सुरू असताना, जमिनीखाली सुमारे शंभर वर्षांपूर्वीची पाणीपुरवठ्याची व्यवस्था आढळून आली आहे. स्वारगेट येथील कॅनॉलमधून पाणी घेऊन ते जलकेंद्राला पुरविण्यासाठी दोन स्वतंत्र वाहिन्या (पाइप) या ठिकाणी टाकल्याचे दिसून आले आहे. त्याची नेमकी माहिती सध्या उपलब्ध नसली, तरी स्वारगेटच्या जलकेंद्राचे काम १९१० च्या सुमारास पूर्ण झाले, तेव्हाच ही व्यवस्था केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट येथील हब’ आणि भुयारी स्टेशनचे काम सध्या सुरू आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (PMPML) बस स्थानक स्थलांतरित केल्यानंतर या ठिकाणी खोदाई सुरू असताना सुमारे ५०-६० मीटर लांबीच्या या भुयाराची रुंदी तीन-साडेतीन फूट असून, उंची ८ ते १० फुटांदरम्यान आहे. या भुयाराच्या दोन्ही बाजूस दगडी भिंती असून, त्यात दोन पाइपलाइन असल्याचे समोर आले आहे. कॅनॉलच्या दिशेने एक पाइपलाइन टाकण्यात आली असून, दुसरी पाइपलाइन स्वारगेट जलकेंद्राच्या दिशेने जाताना दिसून येते. या ठिकाणचे बांधकाम अजूनही पक्के असून, मेट्रोच्या कामामुळे त्याला कोणताही धक्का पोहोचलेला नाही.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!