ठाणे

भिवंडी, कल्याण, ठाणे मतदार संघांचा निवडणूक कार्यक्रम

ठाणे  : लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील 23-भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे या तिन ही लोकसभामतदार संघांसाठी अधिसुचना संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिल्या आहेत.

त्यानुसार नामनिर्देशन पत्रे मंगळवार दि.2 ते मंगळवार दि.9 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळात दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रांची छाननी  बुधवार दि.10 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात होईल. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी शुक्रवार दि.12 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असेल.  निवडणूक लढविली गेल्यास सोमवार दि.29 रोजी सकाळी 7 ते सायं.6 वाजेपर्यंत मतदान होईल.

नामनिर्देशन पत्रे मिळणे, जमा करणे, छाननी, अर्ज माघारी यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये या प्रमाणे-

23 भिवंडी-  उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी भिवंडी यांचे दालन, बस डेपोसमोर, आग्रा रोड भिवंडी.

24- कल्याण- खोली क्रमांक 1,  कडोंमनपास जलतरण तलाव कार्यालय, वै. ह. भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे, क्रीडा संकूल, पेंढारकर कॉलेज जवळ घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व), ता. कल्याण जि. ठाणे.

25- ठाणे-अपर जिल्हाधिकारी, ठाणे यांचे कार्यालय, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, कोर्ट नाका जवळ, ठाणे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!