गुन्हे वृत्त

कल्याणमध्ये देशी बनावटीचे पिस्टल आणि तीन जीवंत काडतुसांसह एकाला अटक

कल्याण  : कल्याणमध्ये देशी बनावटीचे पिस्टल आणि तीन जीवंत काडतुसांसह एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगामी लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर कल्याण कोळसेवाडी पोलिसांची टीम रात्रीच्यावेळी पेट्रोलिंग करत असताना त्यांना विजय नगर येथील पूजा कॉम्प्लेक्स जवळील साईबाबा मंदिरासमोरील मैदानात कोळसेवाडी पो. स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार रवी दाढी हा पिस्टल सारखे हत्यार घेऊन गंभीर गुन्हा करण्याच्या दृष्टीने थांबला असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून सदर ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी रवी दाढी यास देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) आणि तीन जीवंत काडतुसांसह पकडले आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे. सदर गुन्हेगार हा कोळसेवाडी पो.स्टेशनमध्ये पाहिजे आरोपी आहे. ही कामगिरी पो. आयुक्त विवेक फणसळकर, सह.पो. आयुक्त मधुकर पांडे, अपर पो. आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण दिघावकर, पोलीस उप – आयुक्त परि – ३ कल्याण विवेक पानसरे, सहा.पो.आयुक्त. कल्याण विभाग पोवार, यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पो. स्टेशन व.पो.नि शाहूराजे साळवे व पो.नि. गुन्हे मधुकर भोगे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पो.उप.निरी. विलास नलवडे आणि त्यांच्या सोबतचे पोलीस कर्मचारी पोहवा – शिर्के, पोहवा – दहीफळे, पोहवा – श्रीवास, पोना. जमादार, पोना. भोजणे, पोना. जाधव, पो.कॉ जाधव यांनी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!