गुन्हे वृत्त

कल्याण-भिवंडी बायपासजवळ आचारसंहिता पथकाने डिझायर गाडीतून जप्त केली साडेचार लाखांची रोकड

भिवंडी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या वाहन तपासणीमध्ये आज भिवंडीतील आचारसंहिता पथकाने 4 लाख 50 हजारांची रोकड पकडली. आचार संहिता पथ प्रमुख भाऊ भोईर यांनी साईबाबा नाका, कल्याण भिवंडी बायपासजवळ मारुती स्विफ्ट डिझायर गाडीतून (एम एच 48 ए ७८८५) ही रोकड हस्तगत केली.

साईबाबा नाका परिसरात वाहनांची तपासणी सुरू असताना आचारसंहिता पथकाने तपासणीसाठी ही गाडी थांबवली होती. तपासणीमध्ये या गाडीमध्ये तब्बल 4 लाख 50 हजारांची रोकड आढळली. त्यात 2 हजार रुपयांच्या पाच नोटा, 500 रुपयांच्या सातशे ऐंशी नोटा आणि 100 रुपयांच्या 500 नोटा होत्या.

याबाबत वाहन चालक अजीज मोहम्मद वजीर खानकडे विचारणा केली असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्याने तसेच रकमेबाबत पुरावा न दिल्याने ही रक्कम शांतीनगनर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!