संपादक ज्ञानेश्वर मुंडे,बाळकृष्ण कासार तसेच पत्रकार शांत्ताराम गुडेकर,सुभाष कोकणे,मणस्वी मणवे पुरस्कारचे मानकरी
मुंबई (केतन भोज) : अजिंक्य युवा प्रतिष्ठान( रजि.)तर्फे आयोजन केले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा “इंडियन आयकॉन”अवॉर्ड-२०१९ चे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेतलेल्या व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा शिरोडकर सभागृह , के.ई.एम हॉस्पिटल जवळ , परेल पुर्व मुंबई या ठिकाणी संपन्न झाला.या सोहळ्यात१)कला क्षेत्र२) क्रीड़ा क्षेत्र,३)सांस्कृतिक क्षेत्र,४) सामाजिक क्षेत्र, ५) राजकीय क्षेत्र,६) उत्तम पत्रकार,७) कृषि क्षेत्र,
८)सर्वोत्तम उद्योग मार्गदर्शक संस्था,९)सर्वोत्तम सामाजिक संस्था,१०) उत्तम सामाजिक काम करणारे मंडळ,१०) युवा उद्योजक,१२) उद्योजक,१३) उत्तम काम करनारे वर्तमान पत्र,१४) उत्तम काम करणारी इलेक्ट्रॉनिक मीडिया,१५) शिक्षण विभाग यामधील उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती/संस्था/मंडळ यांचा गौरव होणार करण्यातआला.या पुरस्कारसाठी१)सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर(म.रा),२)श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ(रजि.)कासारकोळवण
३)मोहन कदम,४)प्रकाश तोरस्कर५)राजेंद्र भुवड६)सौ.मनस्वी मणवे,७)दिपक कारकर,८)शाहिर सचिन धुमक,९)शाहिर प्रिती भोवड,१०)शाहिर तुषार पंदेरे,११)सुभाष कोकणे,१२)ज्ञानेश्वर मुंडे(साप्ता.शहर नामा/आपले शहर न्युज चँनल),१३)बाळकृष्ण कासार(साप्ताहीक लोकनिर्माण),१४)प्रविण धुमाळ,१५)संतोष गावडे,१६)सौ.आरती मुळीक-परब,१७)अशोक भोईर,१८)शरद भावे,१९)वेदिका आलीम२०)शांत्ताराम गुडेकर यांच्यासह महाराष्ट्रातील विविध संस्था/मंडळ/व्यक्ती यांचा प्रमुख अतिथी अमोल मडामे,शांत्ताराम आंग्रे,दिशा कळंबे,अजिंक्य युवा प्रतिष्ठाण अध्यक्ष प्रसाद मांडवकर,युवा आयोजक दिपक चंदुरकर,एस.के.बंजारा फाऊंडेशन अध्यक्ष मनोज नायक,अनंत जोशी,सिध्देश मिरगल यांच्याहस्ते “इंडियन आयकाँन”पुरस्कार-२०१९ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.यावेळी एकपात्री अभिनय व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला.