मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्याला मारहाण केल्याचा आरोपी तिच्याच फॅशन डिझायनरने केला आहे. याप्रकरणी प्राजक्ता माळीविरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जान्हवी मनचंदा हिने याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार भादंवि कलम ३२३, ५०४ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका शो दरम्यान आपल्याला दिलेले कपडे योग्य नसल्याच्या कारणावरून प्राजक्ताने जान्हवीला मारहाण करत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाशी संबंधित संभाषणाचा व्हाट्स अपचा स्क्रीनशॉटही व्हायरल करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रार देणार असल्याचं जान्हवीने म्हटल्यावर माझे वडील पोलीस तर काका वकील आहेत मला याने काही फरक पडणार नसल्याचे प्राजक्ताने म्हटल्याचं दिसून आलं आहे.