ठाणे

कल्याण लोकसभेसाठी एकूण ३६ उमेदवाराकडून अर्ज दाखल

डोंबिवली  :  मंगळवारी  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी कल्याण लोकसभा मतदारसंघात २२  उमेदवारानी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं आतापर्यत एकून ३६  उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी  या अर्जाची छाननी केली जाणार असून १२  एप्रिल रोजी उमेद्वाराना माघार घेता येणार आहे. यानंतर उमेदवाराची अंतिम यादी निवडणूक निर्णय अधिकार्याकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.
    मंगळवारी  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना भाजपा रिपाईयुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी ढोलताशाच्या गजरात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.   भारतीय किसान पार्टीच्य विनोद साळवे, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाचे संतोष भालेराव, पीस पार्टीचे हबिबूद रहेमान खान, बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीचे हरेश ब्राह्मणे,बहुजन मुक्ती परतीचे गौतम वाकचौरे,भारत प्रभात पार्टीचे डॉ सुरेश गवई यांच्यासह १३ अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!