ठाणे

डोंबिवलीत क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी…

डोंबिवली :- ( शंकर जाधव  ) जयंती निमित्त शहरात विविध संघटना, पक्ष, संस्थाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डोंबिवलीत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डोंबिवली पश्चिमेकडील विष्णूनगर महात्मा फुले यांच्या पुतळ्यास बहुजन समाज पार्टी प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक आनंद नवसागरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीहि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले.

     नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक यांनी सकाळी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या आसपासची सजवत केली होती.नगरसेवक धात्रक यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले.तसेच बहुजन समाज पार्टी प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी  महात्मा फुले यांना अभिवादन करत फुले यांच्या कार्याची महिती उपस्थितांना सांगितली.महात्मा फुले नसते तर स्त्री शिक्षणाबाबत देश अधोगतीच्या मार्गावर राहिला असता.या देशातील ५० टक्के महिला सुशिक्षित झाल्या नसत्या.ज्या देशाची महिला शिक्षित नसते तो देश कदापि प्रगती करू शकत नाही.छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यामुळे देशाची प्रगती झाली. भारत देशाची अस्मिता महात्मा फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळे घडली आहे.या देशाचे पुरोगामित्वाचे आणि प्रगतीचे श्रेय महात्मा फुले यांचाच आहे असे कीरतकर म्हणाले. रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक आनंद नवसागरे, कार्यकर्ते आणि आदर्श पुरस्कार प्राप्त तथा ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले.यावेळी नवसागरे म्हणाले,महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. तो आज सफल झाला आहे.महात्मा फुले यांच्या या महान कार्याला अभिवादन करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांच्या वतीने आज आम्ही आलो आहोत. यावेळी महेंद्र कांबळे,मिलिंद कांबळे,किरण वटाणे,सिद्धार्थ दांडगे,विशाल गायकवाड, निलेश गायकवाड,तुषार गायकवाड,रामजी सूर्यवंशी,अनिल सदानंदशिव, मिलिद घोलप, कपिल सोनावणे,आनंत पारदुले, प्रदीप जगताप, मठेश वाघ, गणेश घोलप आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!