ठाणे

संपूर्ण बिल भरल्याशिवाय मृतदेह देण्यास नकार दिल्याने नातेवाईक आणि नागरिकांचे रणरणत्या उन्हात ठिय्या आंदोलन..  

 डोंबिवली : ( शंकर जाधव  ) बुधवारी पहाटेच्या सुमारास उपचारासाठी रुग्णाला रुग्णालयात दाखल केले,मात्र दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याचे सांगत संपूर्ण बिल भरा त्यानंतर मृतदेह देण्यात येईल असे सांगितल्यावर नातेवाईक प्रचंड संतापले.नातेवाईक आणि जागरूकांनी रुग्णालयाच्या बाहेर रणरणत्या उन्हात ठिय्या आंदोलन केले.काही वेळाने रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांची भेट घेऊन मृतदेह देण्यास परवानगी दिली. रुग्णालयाच्या बाहेर झालेल्या या आंदोलनाची चर्चा शहरात सुरु झाली.

     याबाबत अधिक  माहिती रुग्णाचा मुलगा रुपेश अहिरे यांनी दिली. डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर येथील रवींद्र सुदाम अहिरे ( ४८ ) यांना बुधवारी रात्री उशिरा डोंबिवली पूर्वेकडील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अहिरे यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाने बिलाची रक्कम भरण्यास सांगितले. काही वेळाने तुमच्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा काही रक्कम रुग्णालयात भरण्यास सांगण्यात आले. अहिरे यांना रुग्णालय प्रशासनाने बिलाची उरलेली रक्कम भरा आणि त्यानंतर मृतदेह दिला जाईल असे सांगितल्यानंतर मात्र नातेवाईक प्रचंड संतापले. गुरुवारी दुपारच्या दरम्यान रुग्णालयाच्या अश्या वागणुकिविरोधात नातेवाईक आणि शिवसेना पदाधिकारी संदीप नाईक, कॉंग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र मुळे,समाजसेवक विनोद गिरी यासह काही जागरूक नागरिकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. वातावरण तापू नये म्हणून काही वेळाने पोलीस घटनास्थळी आले.रुग्णालय प्रशासनाने अखेर नातेवाईकांशी चर्चा करून मृतदेह देण्यास आमची हरकत नाही असे सांगितले. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, ११ तारखेला पहाटे १ वाजता स्वादुपिंडच्या आजारामुळे व मल्टी आॅॅर्गन फेल्युअरमुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेले रवींद्र सुदाम अहिरे यांचा गुरुवारी दुपारच्या दरम्यान मृत्यू झाला.रुग्णाच्या गरीब परिस्थितीमुळे त्यांच्या नातेवाईकांनी बिलात सूट देण्यात आली  होती.मात्र संपूर्ण बिल माफ करणे रुग्णालयाला शक्य नाही.मात्र बिलाची रक्कम भरण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित व्यक्तीचा मृतदेह रोखून धरण्यात आलेला नव्हता.त्यांचा मृतदेह तत्काळ नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!